मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली 'बिनशर्त माफी' Saam Tv
मुंबई/पुणे

मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली 'बिनशर्त माफी'

मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे.

हे देखील पहा-

नवाब मलिक यांनी दिलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, "25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर, 2021 च्या आदेशात नोंदवल्यानुसार या न्यायालयाला दिलेल्या माझ्या वचननाम्याच्या उल्लंघनाबाबत मी या माननीय न्यायालयाकडे माझी बिनशर्त माफी मागतो."

मलिक पुढे म्हणाले, "माझा अनादर, अनादर, अतिरेक किंवा या आदेशांचे उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नव्हता."

मी फक्त सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाही..." मलिक यांनी ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांच्यामार्फत हायकोर्टात म्हणणे मांडले आहे. खेद व्यक्त करत हमी देणारे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले..

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात खेद व्यक्त केला आहे. मलिक यांनी यापुढे अशा प्रश्नांना उत्तर न देण्याचे आश्वासन दिले. मलिक यांनी जाणूनबुजून स्वतःच्या विधानाचा भंग केला आणि वानखेडेविरोधात बोलल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला होता. उच्च न्यायालयाने मलिक यांच्यावर कारवाई का करू नये, असे विचारले होते. याचे मलिक यांनी छोट्या प्रतिज्ञापत्रात उत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

SCROLL FOR NEXT