रश्मी पुराणिक
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) बदलीवरती प्रतिक्रिया दिली आहे. Extension मिळालं नाही, हा निर्णय योग्य. जी चूक केली फर्जीवाडा केला त्यामुळे बदली झाली असे नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडेंच्या बोगस सर्टिफिकेटबाबत मलिकांनी तक्रार केली आहे. आम्ही पुरावे सादर करू, जात प्रमाणपत्र खोटं आहे हे सिद्ध होईल असे मलिक म्हणाले. त्याचवेळी अल्पवयीन असताना बार परवाना मिळवला कसा? मूळ खात्यात असताना बार परमिट आहे. दुसऱ्या पत्नीच्या उद्योगाची माहिती दिली नव्हती याची चौकशी सुरू आहे, जे मुद्दे उपस्थित केले त्याचा पाठपुरावा करत आहे. वानखेडे नक्कीच दोषी सिद्ध होतील आणि त्यांना शिक्षा मिळेल अशी ग्वाही नवाब मलिकांनी (Nawab Malik) दिली आहे.
फर्जीवाड्याविरुद्ध लढा सुरुच राहणार
एखादा व्यक्ती मनमानी कारभार करत असेल चुकीच्या पद्धतीने वागत असताना मी काहीही करेल तरी कोणी बोलणार नाही. अती होतं तेव्हा हे होणे गरजेचे होतं या प्रकरणात मी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले. माझ्यावर तक्रार असेल तर तपास करावा, माझ्याबाबतीत खोटी कारवाई करण्यासाठी कोणी प्रोत्साहित करत असेल तर कारवाई केली पाहिजे. मी स्वतः पोलिसांना पत्र लिहून कारवाईची मागणी करेल असे नवाब मलिक म्हणाले. वानखडेंची (Sameer Wankhede) बदली झाली तरी हा लढा थांबणार नाही हा लढा सुरू राहणार असल्याते मलिक म्हणाले.
मोदी मंत्र्यांना वाचवत आहेत...
लखीमपूर प्रकरणी मंत्र्याचा मुलगा मुख्य आरोपी आहे. चार्टशीट फाईल झाल्यावर मोदी मंत्र्यांना (Narendra Modi) वाचवत आहेत, म्हणजे त्यांची पाठराखण केंद्र सरकार करत आहे. त्यांची हकालपट्टी करणे गरजेचे आहे. मुलगा हत्येचा कट रचतो मंत्री राजीनामा देत नाही म्हणजे घटनेची पाठराखण करत असल्याती टीका नवाब मलिकांनी केली आहे. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल यांनी मोदींबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर मलिक म्हणाले हे विधान योग्य नाही. हे सत्य असेल तर देशाची जनता मोदी साहेबांना माफ करणार नाही.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.