'हॉटेल्सचे फुटेज दिले असते, तर तोंड दाखवायला...', मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप Saam Tv
मुंबई/पुणे

'हॉटेल्सचे फुटेज दिले असते, तर तोंड दाखवायला...', मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

"समीर खान केसमध्ये आरोपपत्र आधीच दाखल झालं आहे. तुम्ही जे आरोप करत आहात त्याविषयी माफी मागणार का?"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांचे समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचे सत्र सुरु आहे. मलिक ड्रग्स केस बाबत रोज नवनवीन खुलासे करत आहेत. काल त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स पेडलर सोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले. याचप्रकारे त्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "समीर खान Sameer khan केसमध्ये आरोपपत्र आधीच दाखल झालं आहे. तुम्ही जे आरोप करत आहात त्याविषयी माफी मागणार का?" असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

हे देखील पहा-

मलिक म्हणाले, "जनतेच्या हितासाठी मी 100 वेळा राजीनामा देण्यास तयार आहे. माझ्यावर आरोप केला गेला की, नवाब मलिक यांनी कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली. लोकायुक्तांसमोर आम्ही सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. मी त्यावेळी राजीनामा दिला पण 2008 मध्ये पुन्हा मंत्री झालो" असे नवाब मलिक म्हणाले.

त्यावेळी सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले होते की, नवाब मलिक यांनी जे आदेश दिले आहेत ते योग्य आहेत. आजवर कुणाची हिंमत नाही झाली की माझे अंडरवर्ल्ड सोबत संबंध आहेत असे म्हणण्याची. मागील पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होता गृहखाते तुमच्याकडे होते. तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो हे मी सांगितले होते. त्यावेळी जर मी त्या हॉटेल्सचे फुटेज दिले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. तुमच्या काळात फॉर सिजन हॉटेलमध्ये सतत पार्टीचे आयोजन होत होते. रात्रभर पार्टी सुरू असायची. 15 करोड पार्टीचा आयोजक कोण होता? तुमच्या काळात त्या पार्टी होत होत्या सरकार बदलताच त्या पार्टी बंद झाल्यात असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT