सुशांत सावंत
काल मी जयदीप राणा विषयी बोललो. तो एक ड्रग्स पेडलर आहे हे देखील मी सांगितले होते. कालपासून सांगितले जात आहे की, मी कुणाच्या पत्नीवर बोलत आहे. मी आजवर कुठल्याही महिलेचा उल्लेख केला नाही.जे महिलांवरून प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना मी विचारतोय दुसऱ्यांच्या आई, पत्नी या महिला नाहीत का? किरीट सोमय्या हे काल अजित यांच्या घरातील महिलांवर बोलले. संजय राऊत यांच्या पत्नीवर देखील ते बोलले. फडणवीस काल म्हणाले नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्स मिळाले. देवेंद्र फडणवीस तुमच्या जवळचा वानखेडे आहे त्याला विचारा माझ्या जावयाच्या घरी ड्रग्स सापडला का? माझ्या जावयाच्या घरी कोणतेही ड्रग्स सापडले नाही असे नवाब मलीक म्हणाले.
तर काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर देखील नवाब मलीक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणले की, तुम्ही जे आरोप करत आहात त्याविषयी माफी मागणार का? जनतेच्या हितासाठी मी 100 वेळा राजीनामा दयायला तयार आहे. माझ्यावर आरोप केला गेला की, नवाब मलिक यांनी कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली. लोकायुक्तांसमोर आम्ही सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. मी त्यावेळी राजीनामा दिला पण 2008 मध्ये पुन्हा मंत्री झालो.
हे देखील पहा -
पुढे ते म्हणले की, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले होते की,नवाब मलिक यांनी जे आदेश दिले आहेत ते योग्य आहेत. आजवर कुणाची हिंमत नाही झाली की माझे अंडरवर्ड सोबत संबंध आहेत असे म्हणण्याची. मागील पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होता गृहखाते तुमच्याकडे होते. तुमचा भाऊ हॉटेलमध्ये काय करतो हे मी सांगितले होते. त्यावेळी जर मी त्या हॉटेल्सचे फुटेज दिले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. तुमच्या काळात फॉर सिजन हॉटेलमध्ये सतत पार्टीचे आयोजन होत होते. रात्रभर पार्टी सुरू असायची.15 करोड पार्टीचा आयोजक कोण होता? तुमच्या काळात त्या पार्टी होत होत्या सरकार बदलताच त्या पार्टी बंद का झाल्यात असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
वानखेडे जेव्हा या विभागात आला तेव्हापासून त्याने स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली आहे. के.पी. गोसावी, सॅम डीसोजा यांचा समावेश होता.आर्यन खान केसमध्ये 18 करोडचा सौदा झाला होता. सॅम डिसोझा आता समोर आला आहे. त्याने काल तसे कबूल केले आहे की असा सौदा झाला आहे. गोसावी त्या दिवशी एनसीबीकडे काय करत होता. सर्व फर्जीवाडा समीर वानखेडे करत होता.चित्रपटातील काही कलाकारांना गेल्यावेळी असेच चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये सारा अली खान, दीपिकाला चौकशीसाठी बोलावले होते. यातून हजारो करोड उकळले गेले आहेत. समीर वानखेडे 70 हजारचे शर्ट वापरतो. रोज दोनलाखांचे बूट घालतात. इमानदार लोकांची जीवनशैली समीर वानखेडे याच्यासारखी असायला हवी. समीर वानखडे यांनी आजवर हजारो कोटी उकळले आहेत असा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडे हा मोदींपेक्षाही पुढे निघाला. मोदींपेक्षा महाग कपडे वापरतो. जेएनपिटीवर अफीम असलेली एक बोट 15 दिवसापासून उभी आहे.अ जून का गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पुढे अनिल देशमुख यांच्याविषयी मलिक म्हणाले की, अनिल देशमुख काल ईडीच्या कार्यालयात गेले.अनिल देशमुख यांना त्रास दिला गेला. आरोप करणारा पळून गेला आहे आणि ज्याच्यावर आरोप आहे त्यांना अटक केली आहे. परमवीर सिंग कुठे आहे हे सांगण्याची जबाबदारी केंद्राची आहे. लूक आउट नोटीस देऊन देखील परमबीर सिंग पळाले की त्यांना पळवले याचे उत्तर द्यावे लागेल.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.