Navi Mumbai Vashi to Mankhurd bridge Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईतून नवी मुंबईत काही क्षणात पोहोचणार, गेम चेंजर ब्रीजचं काम पूर्ण; वाशी-मानखुर्द पूल कधी सुरु होणार?

Vashi to Mankhurd Bridge : सायन - पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली.

Prashant Patil

विकास मिरगणे, साम टिव्ही

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या पुलाचं काम अखेर पूर्ण झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पाच जूनला या ब्रिजचं उद्घाटन होत आहे.

सायन - पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. परिणामी, वाशी टोल नाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचेही काम पूर्ण झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पाच जूनला या ब्रिजचं उद्घाटन होत आहे. या पुलामुळे वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून, वाशी ते मानखुर्द हा प्रवासही जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे. त्यातून ऐन कार्यालयीन वेळेत वाहनचालकांना कोंडीत अडकून वेळेचा होणारा अपव्यय टळणार आहे. दरम्यान, दोन किलोमीटर पर्यंत हा पूल असणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

* वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोंडी कमी करणे.

* महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत.

* प्रत्येक पुलावर तीन मार्गिका आहेत.

* प्रकल्पासाठी ५५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

* पुलांची लांबी १८३७ मीटर आहे, तर मुंबईकडील पोहोच मार्ग ३८० मीटर आहे.

* मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. आता वाशीकडून मानखुर्द दिशेला जाणारा पूलही पूर्ण झाला आहे.

* वाहतूक कोंडी कमी होईल, वाशी ते मानखुर्द प्रवास जलद होईल, वेळेची बचत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT