Navi Mumbai Hit and Run Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Hit and Run: नवी मुंबईत हिट अँड रन, भरधाव कारने दोन गाड्यांसह रिक्षाला उडवलं; घटनेचा थरार CCTV त कैद

Vashi Hit and Run Case: नवी मुंबईत हिट अँड रनची घटना घडली आहे. वाशी सेक्टर ९ मध्ये एका निळ्या रंगाच्या कारचालकाने दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक देऊन पळ काढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

राज्यात हिंट अँड रनच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता नवी मुंबईतही हिट अँड रनची घटना घडली आहे. वाशी सेक्टर ९ मध्ये साईनाथ स्कूल समोर एका निळ्या रंगाच्या कारचालकाने दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक देऊन पळ काढला आहे.

या अपघातामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. मात्र कारचालक फरार झाला आहे. मद्यपान करून चालक वाहन चालवत होता, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभा असून त्याच्या काहीच अनंतर पुढे एक रिक्षा रस्त्याने येत होती. तितक्यात निळ्या रंगाची एक भरधाव कार मागून येते आणि रिक्षाला जोरदार धडक देते.

व्हिडिओत दिसत आहे की, ही कार रिक्षाला जोरदार धडक देत त्यापुढेच असलेल्या दोन कारलाही धडकते. हा अपघात इतका भयंकर होता की, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दुचाकीस्वाराचा थरकाप उडताना या व्हिडिओत दिसत आहे.

या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघानंतर आरोपी कारचालक हा फरार झाला आहे. तो मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT