Navi Mumbai Navi Mumbai
मुंबई/पुणे

Navi Mumbai Fire : हृदयद्रावक घटना! किराणा दुकानात सिलेंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Navi Mumbai: दिवाळीमध्ये दुर्दैवी घटना घडली असून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत झालाय. नवी मुंबईत ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Namdeo Kumbhar

Navi Mumbai Ulwe Fire : राज्यात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, रोषणाई आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये साजरा केला जात आहे. राज्यभरात आनंदोत्सव असतानाच नवी मुंबईत मात्र हृदयद्रावक घटना घडली. नवी मुंबईतील (Navi mumbai) उलवे येथील जावळे गावात किराणा दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची तीव्रता अतिशय भयंकर होती, त्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात दम तोडला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उलवे येथील जावळे गावात किराणा मालाच्या दुकानात अवैधरित्या पेट्रोल विक्री करण्यात येत होती. तसेच तिथे लहान सिलेंडरची देखील विक्री करण्यात येत होती. दुकानात स्फोटक साहित्य असताना सायंकाळी पणती पेटविताना पेट्रोलला आग लागून स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण 3 ते 4 लहान सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. त्यात 38 वर्षीय महिला, एक 15 वर्षांची मुलगी असून एक 8 वर्षांचा मुलगा आहे. एकूणच या दुर्घटनेमुळे उलवे विभागात अवैधरित्या होणाऱ्या पेट्रोल विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला असून या दुर्घटनेनंतर तरी पोलीस प्रशासनाला जागं येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT