Turbhe MIDC Fire News: Navi Mumbai Turbhe MIDC Furniture Factory Caught Massive Fire Watch Viral Video Saam TV
मुंबई/पुणे

Turbhe MIDC Fire: नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट, पाहा VIDEO

Satish Daud

Navi Mumbai Turbhe MIDC Fire News

नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला मंगळवारी (ता.२७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यात लाकडी सामान असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)

मात्र, आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह, नवी मुंबई (Navi Mumbai Fire) शहर परिसरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग विझवून नागरिकांचा जीव वाचवत आहेत. आगीच्या घटनांमध्ये शॉर्ट सर्किटचे प्रमाण जास्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील एमआयडीसीमध्ये एक फर्निचर बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यात लाकडी वस्तू तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही कामगार काम करत असताना कारखान्यातील एका भागाला अचानक आग लागली.

कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारखान्यात लाकडी वस्तू असल्याने आगीचा भडका उडाला. त्यामुळे कामगारांनी आपला जीव वाचवण्यासाठी कारखान्याबाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीने संपूर्ण कारखान्याला विळखा घातला होता. आगीचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT