NAVI MUMBAI SIR ROW saam tv
मुंबई/पुणे

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

SIR Controversy: सुप्रिया सुळेंनंतर आता मनसेनं पुन्हा एकदा SIRमधील घोळ उघडकीस आणलाय. कधी लाखो मतदार गहाळ झालेत तर कधी पालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर मतदारांची नोंद आढळून आलीये. त्यात भरीस भर आयोगाचा आणखी एक कारनामा कुठे उघडकीस आलाय?... हा घोळ नेमका काय आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

एकीकडे विरोधकांनी देशभरात SIR विरोधात रान पेटवलेलं असताना राज्यातून मात्र दररोज निवडणूक आयोगाची लक्तरं वेशीला टांगली जाताहेत. नवी मुंबईत काही मतदार चक्क महापालिकेतच राहत असल्याचं उघडकीस आलाय. होय... तुम्ही बरोबर ऐकलंत... नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात तब्बल 27 मतदारांच्या नावांसमोर महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसचा पत्ता नमूद करण्यात आलाय. त्याचं झालं असं की, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी पडताळणी न करता बोगस नावे कुणाच्या सांगण्यावरून मतदार यादीत ठेवलीयेत... हे पाहण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी थेट महापालिकेच्या कार्यालयावर धडक देत पाहणी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाचा हा उफराटा कारभार चव्हाट्यावर आला... इतकंच नव्हे तर SIR प्रक्रियेवरून मनसेनं सरकारवर गंभीर आरोपही केलाय..

विशेष म्हणजे, नवी मुंबईत याआधीही असेच बोगस मतदारांचे धक्कादायक प्रकार समोर आलेत. आणि तेही मनसेनंच SIR यादीतील घोळ आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते.

नवी मुंबईत बोगस मतदारांची मालिका सुरूच

बेलापूर विधानसभा मतदारसंघात एका मतदाराचा पत्ता चक्क 'सुलभ शौचालय' असल्याचं समोर आलं होतं. एव्हंढच नव्हे तर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर शंभरहून अधिक मतदारांच्या नोंदीचाही धक्कादायक प्रकार समोर आला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची फेरतपासणी करण्यासाठी SIR मोहीम राबवलीये. पारदर्शी पध्दतीनं ही योजना राबवल्याचा दावा निवडणुक आयोग करत असलं तरी राजकीय पक्षांकडून सातत्यानं SIR प्रक्रियेची चिरफाड केली जातेय. नुकतंच खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघात तब्बल सात लाख मतदार गायब झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता नवी मुंबईतील बोगस मतदारांची भर पडलीये. त्यामुळे आगामी काळात विरोधकांची लढाई आणखी धारदार होण्याची चिन्हे आहेत....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

नाशिककरांच्या पाण्यात कॅन्सरचं केमिकल? 10 कंपन्यांना टाळं, इतर कंपन्यांचं काय?

Wednesday Horoscope: काही राशींचा आत्मविश्वास वाढणार, तर काहींना मित्रांची मिळणार मदत; वाचा राशीभविष्य

ऊस दरावरून दोन माजी मंत्र्यांनी एकमेकांचे बाप-काका काढले

SCROLL FOR NEXT