Navi Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने भयंकर शिक्षा, शिक्षिकेने मारले विद्यार्थिनीला ४० फटके, हात काळे-निळे पडले

Navi Mumbai Crime: शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. पाढे पाठ नसल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या हातावर उलाथन्याने ४० फटके दिले. नवी मुंबईतल्या रबाळेमध्ये ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ट्युशनच्या शिक्षिकेने ४० फटके दिले

  • विद्यार्थिनीच्या हातावर सूज आणि लाल चट्टे आले

  • पालकांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

  • या घटनेमुळे नवी मुंबईत या घटनेमुळे खळबळ उडाली

शिक्षिकेने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला उलाथन्याने ४० फटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. पाढे पाठ नसल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनीला ही भयंकर शिक्षा दिली. नवी मुंबईतल्या गोठीवली गावात ही घटना घडली. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात शिक्षिकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या शिक्षिकेविरोधात कठोर करावाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीमध्ये शिकते. या मुलीला तिच्या आई-वडिलांनी घराजवळच घरगुती ट्युशन घेणाऱ्या एका शिक्षिकेकडे पाठवले. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाढे पाठ करून येण्यास सांगितले होते. पण पीडित मुलीला पाठे व्यवस्थित बोलता आले नाही. पाढे पाठ न केल्यामुळे शिक्षिका संतापली. तिने या विद्यार्थिनीला भयंकर शिक्षा दिली.

शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलथन्याने एक-दोन नाही तर तब्बल ४० फटके दिले. शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या हातावर फटके मारल्यामुळे तिचा हात सूजला होता आणि तिच्या हातावर लाल चट्टे आले होते. पीडित मुलीला प्रचंड वेदना होत होत्या आणि ती रडत होती. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर तिने आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. पीडित मुलीची अवस्था पाहून तिच्या वडिलांना धक्का बसला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी ट्यूशन टीचरला जाब विचारला असता 'तुमची मुलगी अभ्यास करत नाही. इतर मुलांना देखिल फटके दिले असून याचा त्रास होत असेल तर दुसऱ्या ट्युशनला पाठवा', अशाप्रकारची अरेरावीची भाषा करत या शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या पालकांना हकलून दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांनाही संशय

SCROLL FOR NEXT