नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह  यांची उचलबांगडी ?
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची उचलबांगडी ? Saam TV
मुंबई/पुणे

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची उचलबांगडी ?

विकास मिरगणे

नवी मुंबई : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडून येत असून तसेच डान्स बार क्लब संदर्भामध्ये नवी मुंबई पोलीस कारवाई करताना दिसून येत नाही, याबाबत विधानसभेत सुद्धा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. नवी मुंबईमध्ये डान्सबारचं नवं पेव फुटलंय. फक्त डान्स बार नाही, तर त्याच्या आड वेश्याव्यवसायही सुरु आहे. एक, दोन नाही...तर अनेक ठिकाणी सुरू आहेत.

याबाबत सरकार पोलिसांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारुन सरकारला धारेवर धरलं होतं. नवी मुंबई (Navi Mumbai) शहरामध्ये पोलीस खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. हा भ्रष्टाचार बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून पोलीस विभागाकडून केला जात आहे असा आरोप वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी केला आहे. त्याचमुळे आताचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी प्रशांत बुरडे किंवा आशुतोष डुंबरे यापैकी वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती साम टीव्ही ला सूत्रांची दिली आहे.

बदल्यांमध्ये खास भ्रष्टाचार करण्यासाठी माजी पोलीस अधिकारी यामध्ये समाविष्ट आहेत. पनवेल उरण सानपाडा तळोजा apmc पोलीस स्टेशन इत्यादी भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदली करण्यासाठी तब्बल तीन कोटी मोजावे लागत आहेत. आणि हे पैसे पोलीस आयुक्त कार्यालय गृहमंत्री कार्यालयात जात असल्यांची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. ट्राफिक विभागात जाण्यासाठी दहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये वसुली करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून खास नियुक्ती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये गुन्हेगार वाढत आहे. पोलीस खात्यामध्ये ज्या बदल्या केल्या त्या कमिटी नुसारच केल्या जात आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT