Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच सोलापुरात प्रचारासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ
Prakash Ambedkar On Sushilkumar ShindeSaam Tv
Published On

Prakash Ambedkar On Sushilkumar Shinde:

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना टोकाचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच सोलापुरात प्रचारासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे आपल्या कुटुंबासह भाजपात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा आंबेडकर यांनी केला आहे. आपली संपत्ती वाचवण्यासाठी प्रणिती शिंदे भाजपात जाणार असल्याचा आंबेडकरांचा दावा आहे.

सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला. त्यांच्या सभेसाठी आंबेडकरांनी गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरमध्ये सभा घेतली.

प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

आपली संपत्ती वाचवण्यासाठी निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपसोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. काही दिवसांपूर्वी आंबेडकरांनी साताऱ्यातील बडा नेता भाजपात जाऊन राज्यपाल पद स्वीकारणार, असं भाकीत वर्तवलं होतं. त्यावेळी आंबेडकरांचा रोख पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

राजकारणात वातावरणनिर्मितीसाठी असे गौप्यस्फोट केले जातात. निवडणुकीच्या काळात राजकीय विरोधकांना नामोहरम करणं ही राजकीय पक्षांच्या रणनीतीचाच भाग असतो. आता आंबेडकरांचा हा दावा कितपत खरा ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल.

प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, याआधी विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. ते म्हणाले होते की, काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे विधानसभेत त्यांचं फिस्कटणार, असं ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com