Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये विधानसभेला पुन्हा एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये लागलेला एक बॅनर आहे. युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला लागलेल्या बॅनरवर त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यत आलाय.
Ajit Pawar Vs Yugendra Pawar
Ajit Pawar Vs Yugendra PawarSaam Tv

Maharashtra Politics:

बारामतीमध्ये विधानसभेला पुन्हा एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये लागलेला एक बॅनर आहे. युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला लागलेल्या बॅनरवर त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यत आलाय. त्यामुळे विधानसभेला अजित पवार यांना त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार आव्हान देणार असल्याचं बोललं जातंय.

एकीकडे लोकसभेला अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवत शरद पवार यांची कोंडी केलीय. तर विधानसभेला शरद पवार मोठी खेळी करत अजित पवारांना चेकमेट करणार आहेत. अजित पवार यांना विधानसभेला आव्हान देण्यासाठी सज्ज असलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार कोण आहेत, हे जाणून घेऊ...

Ajit Pawar Vs Yugendra Pawar
Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. ते अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी असल्याचं बोललं जातं. ते चांगले संघटकही आहे. युगेंद्र पवार हे बारामती विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार असून ते शरयू अॅग्रोचे सीईओही आहेत. यासोबतच ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना त्यांनी खंबीर साथ दिली आहे.

Ajit Pawar Vs Yugendra Pawar
PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

दम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान देत काकांना कोंडीत पकडलं. तर विधानसभेला पुतण्या युगेंद्र पवारच काका अजित पवारांना आव्हान देणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेल्या या डावाची राज्यात चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com