सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई
Navi Mumbai Latest News: कोरोनाचा संभाव्य धोका पाहता नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून सावधगिरीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार आता पालिका क्षेत्रात कोविड चाचण्या करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशन, एपीएमसी मार्केट, बाजारपेठ या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात येतील. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन पालिका (Navi Mumbai) आयुक्तांनी केले आहे. यासोबतच महानगरपालिकेचे कोविड सेंटर पुन्हा एकदा सज्ज ठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Navi Mumbai And Panvel News)
कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटने भारताची चिंता वाढवली आहे. याबाबत राज्यातही काळजी घेतली जात आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत राज्य सरकारची काय तयारी सुरु आहे याबाबत माहिती दिली आहे. (Corona Latest News)
कोरोनाशी लढण्यासाठी राज्याची तयारी किती? याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. रुग्णालयीन व्यवस्था नीट ठेवावी त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पूर्ण यंत्रणा सज्ज आहे.
- महाराष्ट्रात फक्त १३२ रुग्ण आहेत.
- वेन्टिलेटर आणि ऑक्सिजन बेड तयार ठेवलेले आहेत.
- कोविड प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहे.
- चार परदेशातून येणाऱ्या नागरिकाची थर्मल टेस्ट केली जाणार.
- नवीन टार्स फोर्स नेमण्यात आलेली आहे, ती डॉ. ओक यांच्या नेतृत्वाखाली नेमणार आहे.
- रॅली आणि मोर्चावर अद्यापतरी बंदी नाही.
- इतकही घाबरण्याचं कारणं नाही पण आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत.
- चीन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडा, डेन्मार्क या देशातून येणाऱ्यांची थर्मल टेस्ट होणार. (Latest Marathi News)
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. IMAने लोकांसाठी सूचनाही जारी केल्या आहेत.
IMAने जारी केलेले निर्देश
सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरावा.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.
नियमितपणे साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे.
विवाह, राजकीय किंवा सामाजिक सभा इत्यादी सार्वजनिक मेळावे टाळावेत.
आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
ताप, घसादुखी, खोकला, लूज मोशन इत्यादी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शक्य तितक्या लवकर तुमचे कोविड लसीकरण करा.
वेळोवेळी जारी केलेल्या सरकारी सल्ल्यांचं पालन करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.