navi mumbai khandesh bhushan award ceremony saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : नवी मुंबईत खान्देश भूषण पुरस्कार प्रदान

Navi Mumbai : नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी चॅरीटेबल ट्रस्टतर्फे खान्देश भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Yash Shirke

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी चॅरीटेबल ट्रस्टतर्फे खान्देश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात प्रशासन, पत्रकारीता, आरोग्य, उद्योग, समाजसेवा या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सन्माननीय बांधवांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, अंधेरीतील एसपीआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एन. चौधरी, आयआयटी पवईच्या संगणक विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. के. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सत्कारमूर्तींमध्ये सकाळ माध्यम समूहाचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट (आयटी) दीपक पाटे, साम टीव्हीचे वरीष्ठ निर्माता-अँकर गिरीश निकम, जीएसटी विभागाचे जॉइंट कमिशनर संजय निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, ए. सी. पाटील इंजिनिअरींग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. दिलीप बोरसे, पनवेलमधील आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनराज विसपुते, खारघरमधील खान्देश रहिवाशी संघाचे अध्यक्ष मधू पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. वैभव भदाणे आदींचा समावेश आहे. यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सप्तशृंगी चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र रौंदळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

सध्याच्या युगात नेटवर्किंगचं महत्व खूप आहे. अशा कार्यक्रमांमधूनच जनसंपर्क वाढतो. विविध क्षेत्रातील मान्यवर इथे एकत्र आले. त्याचा फायदा पुढे विधायक कामांसाठी समाजालाच होणार आहे. त्यामुळे असे उपक्रम राबवणे आवश्यकच आहे, असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी केलं. मुंबई, ठाणे, रायगड आणि कल्याण या सर्व भागातून खान्देशातील बांधव या कार्यक्रमाला आले होते.

या कार्यक्रमात खानदेशी विनोदी कलाकार विलास शिरसाठ यांनी आपली उत्कृष्ट अहिराणी भाषेतून मिमिक्रीची कला सादर करून सर्व खान्देशी बांधवांना भारावून टाकले. श्री सप्तश्रृंगी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यात प्रामुख्याने रमाकांत नागरे, रमेश चित्ते, दौलत पाटील, ॲड विनोद येवले, ॲड जितेंद्र पाटील आदी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र रौंदळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT