Chicken shawarma Food Poision Saam TV
मुंबई/पुणे

Chicken Shawarma: पोटदुखी अन् उलट्या, चिकन शोरमा खाल्ल्याने ५ मुलांना विषबाधा; उरणमध्ये खळबळ

food poisoning of 5 childrens In Uran: नवी मुंबईच्या उरणमध्ये उघड्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ल्याने ५ मुलांची प्रकृती बिघडली. या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

शोरमा खाल्ल्याने ५ मुलांना विषबाधा झाल्याची घटना नवी मुंबईतील उरणमध्ये घडली आहे. या मुलांनी रस्त्याच्या कडेला उघड्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ला होता. या ५ ही मुलांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे उरणमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरणमधील दिघोडे बस स्थानका जवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ल्याने अनेकांची प्रकृती बिघडली. शोरमा खाल्ल्यामुळे ५ मुलांना विषबाधा झाली. शोरमा खाल्ल्यानंतर मुलांच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे पालक चिंतेत आले. त्यांनी मुलांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलांवर उपचार सुरू आहेत.

या सर्व मुलांनी रस्त्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती तपासातून समोर आली. अन्न व औषध प्रशासनाने आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोगाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मानखुर्द परिसरामध्ये शोरमा खाल्ल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही घटना घडली होती. शोरमा खाल्ल्यामुळे १० ते १२ जणांना विषबाधा झाली होती. प्रकृती जास्तच बिघडल्यामुळे उपचारादरम्यान १९ वर्षांच्या प्रथमेश भोकसे या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT