Navi mumbai water pipeline burst Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली, पाणी पुरवठा बंद; पाहा VIDEO

Navi Mumbai Water Pipeline Burst: नवी मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटली. मोरबे धरणाची जलवाहिनी कळंबोली येथे फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली. मोरबे धरणाची जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटल्यामुळे नवी मुंबई शहराचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे. आज संध्याकाळपर्यंत नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची २०४२ मिलिमिटर व्यासाची मुख्य जलवाहिनी मार्बल मार्केट कळंबोली येथे फुटली. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून पाण्याचे उंचच उंच फवारे उडाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी तातडीने बंद करण्यात आला.

पाणी पुरवठा विभागाकडून मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास आणि सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे येथे होणारा पाणीपुरवठा आज संध्याकाळपर्यंत बंद राहणार आहे.

तसंच उद्या सकाळचा पाणीपुरवठा देखील कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्याचे व्हिडीओ समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT