Navi Mumbai fraud case Saam TV marathi
मुंबई/पुणे

नवी मुंबईतही 'अशोक खरात'! आदर्श म्हात्रेचे कारनामे एकूण चक्रावाल, ४०महिलांवर लैंगिक अत्याचार

Navi Mumbai fraud case : नवी मुंबईत बनावट ओळख वापरून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. मॅट्रिमोनी साईट्सद्वारे महिलांना जाळ्यात ओढून आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Namdeo Kumbhar

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi Mumbai matrimonial scam fake officer case details : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरातसारखेच आता नवी मुंबईतून फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आदर्श म्हात्रे (वय ३५) नावाच्या एका भामट्याने इस्त्रोचा शास्त्रज्ञ (ISRO Scientist) किंवा आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. म्हात्रेने महिलांना कोट्यवधी रुपयांना लुटले आहे. त्याच्यावर आतापर्यंत तब्बल ४० गुन्हे दाखल झाले आहे. या घटनेमुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे 'आदर्श'ची मोडस ऑपरेंडी?

आदर्श म्हात्रे हा अत्यंत चणाक्षपणे महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तो प्रामुख्याने मॅट्रिमोनी साईट्सवरून अशा महिलांना शोधायचा ज्यांचे लग्नाचे वय निघून गेले आहे, अथवा घटस्फोटीत किंवा विधवा आहेत. म्हात्रे वर्षाला २५ ते ३५ लाख रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनाच लक्ष्य करायचा. स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी तो आपण इस्त्रोचे शास्त्रज्ञ किंवा मोठे सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. आलिशान गाड्यांमधून फिरणे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलांना नेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे, ही त्याची पद्धत होती.

अशी करायचा फसवणूक

एकदा का महिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली की, तो त्यांचे लैंगिक शोषण करायचा. इतकेच नव्हे तर महिलांना भावनिक साद घालून त्यांच्या नावावर ३५ ते ४० लाख रुपयांचे कर्ज (Loan) काढायला लावायचा. हे पैसे आपल्या भावाच्या खात्यावर वळवून तो गोव्याला जाऊन चैनी करायचा. फसवणूक पूर्ण झाल्यानंतर तो आपला मोबाईल नंबर बंद करून पसार व्हायचा.

अनेक महिलांची तक्रार देण्यास नकार

नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हात्रेच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ५० महिलांनी सामाजिक प्रतिष्ठेपोटी तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्याचे गुन्हे केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नसून ठाणे, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक आणि अगदी कर्नाटक राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

आदर्शची बनावट नावे

तपासादरम्यान समोर आले आहे की, तो स्वप्नील वारूळ, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे आणि तन्मय म्हात्रे अशा विविध नावांनी वावरत होता. या घटनेमुळे महिलांनी मॅट्रिमोनी साईट्सवर ओळख झालेल्या व्यक्तींची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

अशोक खरातचे डर्टी चॅट्स अन् नको ते व्हिडिओ आले समोर; पोलिसांनी रिकव्हर केला मोबाईल डेटा, मोठा भांडाफोड होणार

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT