Navi Mumbai kamothe Fire : नवी मुंबईतील कामोठ्यात दिवाळीच्या सणात दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली अन् एकच हाहाकार (Navi Mumbai Kamothe cylinder blast news update) उडाला. या दुर्दैवी घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला आहे. तर त्याच कुटुंबातील तीन जण बचावले आहेत. डोळ्यासमोर दोघींचा मृत्यू झाल्याचे पाहल्यानंतर त्यांचा आक्रोश कामोठ्यात पसरला. आज पहाटे ही दुर्दैवी घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. (Diwali day fire accident in Kamothe Navi Mumbai)
नवी मुंबईमधील कामोठे येथील सेक्टर ३६ मध्ये असणाऱ्या अंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत सकाळी सिलिंडरचा स्फोट झाला अन् आगीचा भडका उडाला. आगीच्या ज्वाळा अन् काळेकुट्ट धूर दिसताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. दुसऱ्या मजल्यावर आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत माय-लेकी अडकल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. पण माय लेकींना वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अंबे श्रध्दा सहकारी सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर आग मोठ्या प्रमाणात लागली होती. अग्निशमन दलाने इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा केला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून कुलिंगचे काम करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. घरात दिवाळीचे साहित्य होतं, त्यामुळे आग लगेच वेगाने पसरली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच गाड्या पोहचल्या होत्या. आग लागलेल्या घरातून तीन सदस्या बाहेर पडले, पण दोन जण आतमध्येच अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. पण आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. मायलेकीच आत अडकून कशा राहिल्या? याबाबतचे कोणतेही कारम अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून या दुर्घटनेची नोंद करण्यात आली असून तपास केला जात आहे. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.