Navi Mumbai Crime saam Tv
मुंबई/पुणे

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; ६ हजारासाठी तरूणींवर दबाव, पोलिसांकडून पर्दाफाश

Prostitution Racket in Navi Mumbai: नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश. सीबीडी बेलापूर पोलिसांनी स्पावर धाड टाकत आरोपींना रंगेहाथ पकडलं.

Bhagyashree Kamble

  • नवी मुंबईतील भयंकर प्रकार.

  • स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय.

  • आरोपी अटकेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या घटना उघडकीस येत होत्या. अशातच नवी मुंबईतही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ महिलांची सुटका केली आहे. तसेच स्पा मालक आणि त्याच्या सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त भलिंद्र भारंबे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तपासाला सुरूवात केली. सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथील 'मॅजिक मोमेंट व्हेलनेस स्पा' येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. सहा हजार रूपयांच्या मोबदल्यात महिलांना जबरदस्तीनं देहविक्रीसाठी दबाव टाकण्यात येत असल्याचं समोर आलं.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी प्लान रचला. बनावट ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आले. ग्राहकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांना १५ महिल्या आढळून आल्या. मसाजच्या नावाखाली महिलांना देहविक्री करण्यासाठी दबाव टाकत असल्याची माहिती मिळाली.

यात २ महिला थायलंडमधील असून, १ नेपाळ, २ दिल्ली, २ उत्तर प्रदेश, १ पश्चिम बंगाल, १ गुजरात आणि ६ महाराष्ट्रातील महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

Politics : काँग्रेसचा 'पायलट' प्रोजेक्ट! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यांत मोठी उलथापालथ होणार

Pakistan Cricket Team : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय; पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

SCROLL FOR NEXT