Vegetables price down Saam TV
मुंबई/पुणे

Vegetable Price: भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा पण बळीराजा चिंतेत; जाणून घ्या आजचे भाव

Navi Mumbai APMC Market: नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचा पुरवठा जास्त मात्र मालाला उठाव नसल्याने हे दर घसरले आहेत. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर काय आहेत हे घ्या जाणून...

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

गेल्या काही दिवसांपासून वाढलेले भाज्यांचे भाव अचानक घसरले आहे. पण आता थंडीमुळे भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमपी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. एपीएमसीमध्ये तब्बल ६५० भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक होत आहे.

भाजीपाल्याचा पुरवठा जास्त मात्र मालाला उठाव नसल्याने हे दर घसरले आहेत. फ्लॉवर, कोबी, भोपळा, टोमॅटो आणि वांग्याचे दर 5 ते 10 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर पालेभाजी देखील 5 ते 10 रुपये प्रति जुडी मिळत आहे. भाज्यांचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण शेतकरी चिंतेत आले आहेत.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. भाज्यांचे दर कडाडल्यामुळे सर्वसामान्यां जास्त पैसे मोजावे लागत होते. पण आता थंडी वाढल्यामुळे भाजीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. भाज्यांचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

घसरलेल्या भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो -

फ्लॉवर- 6 रुपये

कोबी - 8 रुपये

भोपळा - 10 रुपये

टोमॅटो - 10 रुपये

वांगी - 10 रुपये

दुधी - 13 रुपये

पडवळ - 16 रुपये

घेवडा - 18 रुपये

पालेभाज्यांचे दर प्रति जुडी -

कांदापात - 7 ते 8 रुपये

कोथिंबीर - 6 ते 8 रुपये

मेथी - 6 ते 8 रुपये

पालक - 5 रुपये

पुदिना - 6 रुपये

शेपू- 8 ते 10 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra : शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार, ३ दिवसांत अधिसूचना काढणार; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: नागपुरात महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेचा प्रवास सुसाट

Lasun Khanyache Fayde: सकाळी रिकाम्यापोटी कच्चा लसून खा, हे 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

Mrugagad Fort : इतिहास ते सह्याद्रीचा ३६०° नजारा...,मृगगडाबद्दल कधी ऐकलंय का?

Walking for weight loss: वजन कमी करण्यासाठी रोज चालताय? पण या ७ चुका टाळा; नाहीतर वॉकिंगची मेहनत जाईल वाया

SCROLL FOR NEXT