Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Manasvi Choudhary

दाढी करणे

पुरुषांच्या दैनंदिन ग्रूमिंगमध्ये दाढी करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक पुरुष दररोज किंवा २-३ दिवसांनी दाढी करतात.

Grooming Tips For Men

त्वचेचे गंभीर नुकसान

परंतु, अनेकदा घाईघाईत किंवा पैसे वाचवण्याच्या नादात अनेक पुरुष एकच रेझर किंवा ब्लेड वारंवार वापरतात. पण तुम्हाला माहितीये का? गंजलेले किंवा जुने, बोथट झालेले ब्लेड वापरल्याने त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते.

Grooming Tips For Men

जुना रेझर वापरल्याने होणारे दुष्परिणाम

जुने ब्लेड बोथट झालेले असते. त्यामुळे दाढी करताना ते केसांवर सहज फिरण्याऐवजी त्वचेवर घासले जाते. यामुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ आणि तीव्र जळजळ निर्माण होते.

Grooming Tips For Men

केस आतल्या बाजूने वाढणे

बोथट ब्लेडमुळे केस मुळापासून योग्यरीत्या कापले जात नाहीत. यामुळे कापलेले केस त्वचेच्या आतल्या बाजूला वाढू लागतात. यामुळे त्वचेवर लहान फोड तयार होतात आणि वेदना होतात.

Ingrown Hair

पिगमेंटेशन आणि डाग

वारंवार जुन्या ब्लेडचे घर्षण झाल्यामुळे त्वचा खराब होते. यामुळे दाढीच्या भागात त्वचा काळी पडू लागते आणि पिगमेंटेशनची समस्या निर्माण होते.

Pigmentation & Dark Spots

बॅक्टेरियल संसर्ग

वापरलेल्या ब्लेडवर आणि रेझरवर बॅक्टेरिया व बुरशी वेगाने वाढतात. तसेच गंजलेल्या ब्लेडमुळेबॅक्टेरियल इन्फेक्शन आणि इन्फेक्शन पसरण्याचा मोठा धोका असतो.

Infections | yandex

टिप

येते दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

Turmeric Bath Benefits
येथे क्लिक करा..