Navi Mumbai Airport-Thane Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport-Thane: वेळ वाचणार! ठाणे-नवी नवी मुंबई विमानतळ झटक्यात पोहचा, एलिव्हेटेड रोडचा सरकारचा मास्टरप्लॅन

Navi Mumbai Airport-Thane Elevated Road: नवी मुंबई एअरपोर्ट आणि ठाण्याला जोडले जाणार आहे. आता ठाणे ते नवी मुंबईदरम्यान एलिव्हेटेड रोड सुरु करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईत लवकरच नवीन विमानतळ सुरु होणार आहे. नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरु होणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर होणार आहे. दरम्यान, राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाच्या अनेक प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेथखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, आता नवी मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी नवा एलिव्हेटेड रोड सुरु केला जाणार आहे. यामुळे ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार आहे.

ठाणेकर आणि नवी मुंबईकरांसाठीही महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा आता मोकळा झाला आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.हा एलिव्हेटेड रोड 25 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान व समर्पित दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे.

मुंबईत मेट्रो मार्गिका 11 या प्रकल्पालादेखील हिरवा कंदील मिळाला आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या 16 किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिका सुरु करण्यात येणार आहे. ही मेट्रो श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व हॉर्निमन सर्कल अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरून ही मेट्रो धावेल. या प्रकल्पाचा खर्च जवळपास ₹24,000 कोटी रुपये आहे. या मार्गिकेमुळे मुंबईकरांना वाहतुकीत मोठा दिलासा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हासनगरमधील जसलोक हायस्कूलजवळील घराची भिंत कोसळली

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

दारूच्या नशेत महिलांनी घातला राडा, मुंबई-पुणे हायवेवर तुफान हाणामारी | VIDEO

Breaking : मोठी बातमी! यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यामध्ये बुडून ४ मुलांचा मृत्यू

मुंबई, ठाण्यासाठी पुढील ७ तास अत्यंत महत्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता | VIDEO

SCROLL FOR NEXT