Navi Mumbai Airport Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Airport : अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी नवी मुंबईहून विमान झेपवणार, वाचा सविस्तर

Navi Mumbai Airport 1st Take off Date: येत्या २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यवसायिक उड्डाण होणार आहे. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्या सेवा सुरू करणार आहेत. दिवसभरात १२ फ्लाइट्स देण्याची योजना आहे.

Alisha Khedekar

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावर व्यवसायिक उड्डाणांची सुरुवात

इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेस सेवा देणार

तिकिट बुकिंग लवकरच सुरू होणार

डोमेस्टिक सेवा तत्काळ सुरू होणार

विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकिट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला करण्यात आले. परंतु त्यानंतर विमानतळाहून प्रवासी सेवा सुरू झाली नव्हती. विमानतळावर सुरक्षाविषयक यंत्रणा बसवण्यासाठी आणि सुरक्षा दलाला तैनात करण्यासाठी ४५ दिवसांकरिता विमानतळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर सर्व सुरक्षाविषयक खबरदारी घेतल्यानंतर विमानतळ सुरू करण्यात येत आहे.

विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये अंतर्गत सजावट आणि सुविधाविषयक कामे अंतिम टप्प्यात असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा लगेच सुरू होणार नाही, असे एनएमआयएएलकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. परंतु विमानतळाहून तत्काळ डोमेस्टिक सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापन आग्रही होते. सध्या एनएमआयएएल विमानतळ चालवणाऱ्या कंपनीसोबत एअर इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या कंपन्यांनी प्रवासी वे सेवा सुरू करण्याबाबत करार केला आहे.

त्यानुसार एनएमआयएएलने या कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर २५ डिसेंबरपासून प्रवासी सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने पत्र दिल्याचे समजते आहे. जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने सुट्ट्यांच्या हंगामात विमानसेवांमध्ये मागणी वाढते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई विमानतळाहून ख्रिसमससारख्या सणाच्या काळात मुंबई, नवी मुंबईकरांना पहिल्यांदा नवी मुंबईच्या जमिनीहून उडण्याचा अनुभव घेता येणार आहे. दिवसभरात १२ उड्डाणे होणार असल्याचे समजते आहे. गोवा, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, केरळ अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये सेवा दिली जाणार असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची हत्या, गर्लफ्रेंडनेच रचला होता कट; आधी बॉयफ्रेंडला संपवलं नंतर...

Maharashtra Live News Update: पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

कोणत्या भाजीत मोहरी घालू नये

Mahaparinirvan Din : ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, बाबासाहेबांना केलं अभिवादन

क्लासला जात असल्याचं सांगितलं, बसस्थानकावर गेल्या.. तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता

SCROLL FOR NEXT