Navi Mumbai Accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Accident: नवी मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव कारची कंटेनरला धडक, २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Navi Mumbai Accident: नवी मुंबईतल्या नेरूळमधील सहा तरुण जेवणासाठी हॉटेलवर गेले होते. यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला. पनवेलजवळ कारने कंटेनरला धडक दिली. अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • नवी मुंबईतील जेएनपीटी-पनवेल रस्त्यावर भीषण अपघात

  • भरधाव कारने कंटेनरला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

  • अपघातामध्ये चार तरुण जखमी झाले

  • अपघाताच जखमी झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा

नवी मुंबईमध्ये कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले. शनिवारी रात्री उशिरा जेएनपीटी-पनवेल रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. नेरूळ येथील ६ मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते यावेळी ही अपघाताची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ येथील काही तरुण शनिवारी रात्री जेवणाची पार्टी करण्याचे ठरवले होते. हे सर्वजण जेवणासाठी एका हॉटेलवर जात होते. जेएनपीटी- पनवेल रस्त्यावरून ते पनवेल येथील पळस्पेच्या दिशेने जात होते. मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास त्यांची कार पंकज पार्किंगजवळील भांगरपाडा येथील पुलावर पोहचली. कारचा वेग जास्त होता. या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या सहाही तरुणांना पोलिसांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामधील दोन तरुणांची प्रकृती गंभीर होती. या दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. तर इतर चौघांवर उपचार करण्यात आले. या चौघांना किरकोळ दुखापत झाली होती.

हितेंद्र पाटील (२२ वर्षे) आणि श्रीनाथ चंद्रशेखर (२२ वर्षे) या दोन तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या श्रीनाथच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिसांनी हर्ष पाटील (२१ वर्षे) या जखमी आणि कारचालक तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. या अपघातामध्ये कारचालक हर्ष पाटील आणि इतर तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून घरी सोडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Soup Recipe: थंडीत जेवण वेळेवर पचत नाही? हे Veg सूप ठरेल बेस्ट, वाचा सिंपल रेसिपी

Mohammed Rafi Award 2025 : ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Nashik- Akkalkot Expressway: नाशिक-अक्कलकोट फक्त ४ तासांत, सहा लेनचा सुपरहायवे, वाचा कसा असेल हा मार्ग

मोठी बातमी! आज आचारसंहिता लागणार, २९ महापालिका निवडणुकीची घोषणा होणार

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंच्या त्या 'सावली'ची गोष्ट, जिच्यामुळे हिमालय उभा राहिला

SCROLL FOR NEXT