Navi Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : नवी मुंबईत अपघाताचा थरारा! भरधाव कार पुलाचं रेलिंग तोडून नदीत कोसळली, तरुणाचा मृत्यू

Navi Mumbai Accident News : नवी मुंबईतील पुलावर भीषण अपघात झाला. मागून क्रेटाने धडक दिल्याने स्विफ्ट कार पुलाचे रेलिंग तोडून थेट नदीत कोसळली. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Alisha Khedekar

खारघर कासाडी नदी पुलावर स्विफ्ट कार थेट नदीत कोसळून भीषण अपघात

मागून क्रेटा धडक दिल्याने कार 25 फूट खाली पडली

चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कार नदीतून बाहेर काढली

अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल परिसरातील कासाडी नदी पुलावरुन एक सफेद रंगाची स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट नदीत कोसळली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्ग खारघर खाडी पुलावरुन एक सफेद रंगाची स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट नदीत कोसळली. क्रेटा कारणे मागून धडक देऊन नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाचं रेलिंग तोडून थेट 25 फूट खाली कोसळली आणि नदीच्या पाण्यात पडली.

शुक्रवार रात्री दहा वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने गाडीला पाण्यातून बाहेर काढले .

या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांनी मृत व्यक्तीला जवळच्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र रोड पुलावरील या भीषण अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : उन्हाचा फटका, बॅटरी गरम झाल्याने दुचाकीने घेतला पेट

Raja Shivaji Show Cancel: मुंबईतल्या प्रसिद्ध थिएटरमध्ये 'राजा शिवाजी'चा शो अचानक रद्द; प्रेक्षकांचा संताप अनावर

Cucumber Benefits For Face: उन्हाळ्यात चेहऱ्यावर काकडीचा असा करा वापर, पार्लरमधील महागडे फेशियल विसरून जाल

Video : जुगाड! टॅलेंट भारताबाहेर जायला नको; पठ्ठ्याने २ शेळ्यांना स्कुटीच्या डिक्कीत बसवून गावभर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

Nagraj Manjule: 'खाशाबा' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर कोर्टाकडून मंजुळेंना नोटीस, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT