The Mercedes car involved in the Kharghar accident that claimed the life of a woman and injured her husband. AI Image
मुंबई/पुणे

Navi Mumbai : धनदांडग्याच्या मुलीने कारने स्कुटी उडवली, महिलेनं जागेवरच जीव सोडला, १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनीला बेड्या

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत खारघरमध्ये मर्सिडीज कारने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने ५० वर्षीय महिलेला प्राण गमवावा लागला. तिचा पती गंभीर जखमी झाला. १९ वर्षीय अभियंता विद्यार्थिनी तिर्था सिंगवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

Engineering student causes death in rash driving incident : नवी मुंबईत धनदांडग्याच्या मुलीने मर्सिडीजने एका स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की स्कुटीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली, तिचा जागेवरच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. नवी मुंबईतील खारघरमध्ये बुधवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी तात्काळ कारचालक १९ वर्षीय मुलीला ताब्यात घेतलं. मुलीचे नाव तीर्था सिंग असून ती अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत आहे.

नवी मुंबईतील खारघर परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या एका भीषण अपघाताने सर्वांनाच धक्का बसला. सायन-पनवेल मार्गावरील हिरानंदानी पूलाजवळ मर्सिडीज कारने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने ५० वर्षीय रेखा यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती गोपाल दत्तू यादव (५४) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खारघर पोलिसांनी १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनी तीर्था सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तीर्था ही नवीन पनवेल येथील रहिवासी असून, ती बेलापूर येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती आणि परतताना हा अपघात घडला.

हा अपघात बुधवारी रात्री ८:४५ च्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीर्था ही मर्सिडीज कार अत्यंत वेगाने आणि बेफिकीरपणे चालवत होती. यामुळे तिच्या कारने पनवेलकडे जाणाऱ्या रेखा आणि गोपाल यादव यांच्या स्कुटीला मागून धडक दिली. या धडकेमुळे दोघेही स्कूटरवरून खाली पडले. रेखा यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोपाल यांना हात, पाय आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खारघर पोलिसांनी तीर्था सिंग यांच्यावर निष्काळजी वाहन चालवल्याचा आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिर्था हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे. सध्या पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत, जेणेकरून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुम्हाला आमच्यासोबत येण्याचा स्कोप आहे, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

Pune Bhide bridge : भिडे पूल कधी सुरु होणार? वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागले; दहीहंडी, गणेशोत्सवाआधी प्रश्न सोडवण्याची मागणी

Heart Health: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये काय फरक आहे?

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन; योग्य मोबदला मिळण्यासाठी आक्रमक

Pune : डिलिव्हरी बॉय बनून यायचा अन् वाहनांची चोरी करायचा, चोराला पुणे पोलिसांनी अद्दल घडवली

SCROLL FOR NEXT