निसर्ग सौंदर्य बहरला! पण पर्यटनांवर बंदी...
निसर्ग सौंदर्य बहरला! पण पर्यटनांवर बंदी...  दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

निसर्ग सौंदर्य बहरला! पण पर्यटनांवर बंदी...

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

मावळ : मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या, संततधार पावसाने Rain आंदर मावळ Maval भागामधील धबधबे Waterfalls डोंगरदऱ्या मधुन वाहू लागले आहे. यामुळे आंदर मावळचा निसर्ग खुलला आहे. रिम- झिमत्या पावसामुळे, धबधब्यांमुळे, हिरव्यागार झाडां-झुडपांमुळे, धुक्याने आंदर मावळचे निसर्ग सौंदर्य उठून दिसत आहे. मात्र, कोरोनाने पर्यटनस्थळास बंदी असल्याने पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणे अशक्य झाले आहे.

हे देखील पहा-

यामुळे गभालेवाडी Gabhalewadi, कांब्रे, वडेश्वर, आणि डाहुली Dahuli या ठिकाणी असलेल्या धबधबे पर्यटकांविना tourists सुनेसुने वाटू लागले आहेत. मावळचे सौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. देशाच्या विविध भागांमध्ये हौशी पर्यटकांसह देश- विदेशा मधील हजारो पर्यटक मावळामध्ये साहसी पर्यटन अनुभवण्यासाठी येत असतात.

मात्र, कोरोनामुळे Corona तालुक्यात पर्यटनावर बंदी घातली आहे. ८ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले भरभरून भरून वाहत आहे, तर नद्यांना पूर देखील आले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. भात शेती वाहून गेली तसेच दरडी कोसळून नुकसानही झाले आहे. मावळने एकीकडे निसर्गाचे रौद्र रूप बघितले आहे.

दुसरीकडे पावसाचा जोर कमी झाल्याने निसर्ग समृद्धीने भरलेल्याचे रूप ही अनुभवले आहे. नदी आणि धरणाच्या दिशेने ओसंडून वाहणारे महाकाय धबधबे आंतर मावळात सर्वाधिक आहेत. यामुळे नाणे आणि पवन मावळात धबधबे वाहत आहेत. मावळ तालुका हा पर्यटन नगरी खरेच या निसर्ग सौंदर्याने शोभून दिसत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10th Exam Fess: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ, आता किती फी भरावी लागणार?

Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल; मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Raigad Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-Monsoon Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या २४ तासात मान्सूनपूर्व पाऊस कोसळणार; IMD अंदाज

SCROLL FOR NEXT