Forensic report exposes shocking brutality in Nasrapur minor assault and murder case saam tv
मुंबई/पुणे

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

नसरापूरमध्ये अत्याचार झालेल्या बालिकेच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलाय. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालातून नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य कसं उघडकीस आलयं ?

Girish Nikam

नसरापूरमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र सून्न झालाय. सर्व स्तरावर तीव्र प्रतिक्रीया उमटत असतानाच शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससूनमधील न्यायवैद्यक विभागात शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ करण्यात आली होती. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. त्यातून नराधमाने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे स्पष्ट झालंय.

नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा

आरोपीने लैंगिक अत्याचार करून खून करताना मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला होता. त्यामुळे ऍस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडून बालिकेचा मृत्यू झाला, असं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय. तसेच अंगावर जखमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील तपासणीतूनच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

ससून रुग्णालयात ६५ वर्षांच्या आरोपीची लैंगिक सक्षमता तपासणीही करण्यात आली आहे. दुसरीकडे चिमुरडीच्या आई-वडीलांचा आक्रोश मन सुन्न करत आहे. दोन दिवसांपासून त्यांनी अन्न ग्रहण केले नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘तिला गाय आणि वासरू खूप आवडायचे. दोन दिवसांपूर्वीच एका गायीला वासरू झाले होते. ते पाहण्यासाठीच ती गोठ्याकडे गेली’ अशा शब्दांत वडिलांनी आपल्या लेकीच्या आठवणी सांगताना हळहळ व्यक्त केली. तर आई सतत चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून रडत आहे. ‘सीसीटीव्ही’ फूटेजसह विविध तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. नराधमाला फाशीची शिक्षा कधी होणार ? याकडे पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याचं लक्ष आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT