नसरापूर प्रकरणाचा सर्वच स्तरातून निषेध
प्रवीण तरडेकडून तातडीने कारवाईची मागणी
गायक उत्कर्ष शिंदेनेही नोंदवला निषेध
पुण्यातील नसरापूर प्रकरणाचे पडसाद सर्वच स्तरात उमटताना दिसताहेत. चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांसहित कलाकारांकडूनही केली जात आहे. पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर काल रात्री उशिरा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज रविवारी पुण्यातील विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. या प्रकरणावरून सिने अभिनेते प्रवीण तरडे यांनीही संताप व्यक्त केला आहे. नराधमाचे एक घाव दोन तुकडे करा, असा सल्ला अभिनेता प्रवीण तरडे यांनी पोलिसांना दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूरमधील घटनेवरून राज्यासहित मनोरंजनसृष्टीतही पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. नसरापूर प्रकरणावर मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही संताप व्यक्त केला आहे. तरडे म्हणाले, समाजात घाण पसरत चालली आहे. त्यादिवशी तो सापडला होता. त्याच दिवशी त्याला लोकांकडे सोपवून दिलं पाहिजे होतं. त्याला त्याच दिवशी मारायला पाहिजे होतं. जे काय करायचं आहे ते लवकर करा आणि एक घाव दोन तुकडे करा, असं स्पष्ट मत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं आहे. यासहित अभिनेते रमेश परदेशी यांनी सुद्धा याबाबत संतापजनक मत व्यक्त केला आहे.
अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदे म्हटलं की, 'आपल्यातला माणूस खरंच जिवंत आहे का? कोण्या एका नराधमाकडून बलात्कार खून कधीच कोण्या एका लहान बाळावर केला जात नाही. तर तो खून, बलात्कार बाळाच्या भविष्य,स्वप्नांवर होतो. पीडित बाळाच्या आई- वडील, कुटुंब, गाव, जिल्ह्यावर बलात्कार होतो. सबंध राज्य, राजकारणी, सरकार, देशांवर होतो. आता तर आपल्या येथे महिलांवर सेकंदाला बलात्कार होत आहेत. काहींना लाडक्या बहिणी बनवलं, तरी काहींना तुटपुंज्या योजना दिल्या. न्याय मात्र कोणाच्या पदरी कधीच दिला नाही.
'आपला समाज एक भोळी जनता बनून सारखं आपल काळे फलक, मेणबत्या रास्ता रोको करत सरकारला गयावया करत उपोषण करत बसायचं. न्याय किती कधी कसा मिळेल हे सर्वनाच माहिती आहे. आपण फक्त येणाऱ्या जाणाऱ्या सरकारवर विश्वास ठेवायचा. काही तर इतके निर्लज्य असतात की, आपल्या घरात थोडीच झालंय म्हणत, टीव्ही वर कार्यक्रम बघत मस्त पिझ्झा ऑर्डर करून सोयीने या विषयावर काना डोळा करतात. खरंतर या सर्व मानसिकतेची लाज वाटतीये. कारण जे न्यायासाठी रास्ता रोको करतील, सीसीटीव्हीत दिसतील, आवाज उठवतील, त्यांच्यावर केसेस लागताना पुढे दिसेल. न्याय तर भेटणार नाहीच, पण केसेस लागून तारखा नक्कीच भेटतील, अशा शब्दात उत्कर्ष शिंदेने संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.