Manasvi Choudhary
मराठी दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याचे नाव प्राचीन परंपरा आणि भारतीय कालगणनेशी जोडलेले आहे. चैत्रापासून फाल्गुनपर्यंतच्या १२ महिन्यांना विशिष्ट नावं कशी मिळाली, यामागे रंजक इतिहास आहे.
या महिन्यातील पौर्णिमेच्या सुमारास चंद्र हा चित्रा नक्षत्राजवळ असतो त्यामळे या महिन्याला चैत्र हे नाव पडलं.
या महिन्यातील पौर्णिमेच्या सुमारास चंद्र हा विशाखा नक्षत्राजवळ असतो त्यामुळे या महिन्याला वैशाख हे नाव मिळालं.
या महिन्यातील पौर्णिमेच्या सुमारास चंद्र हा ज्येष्ठा नक्षत्राजवळ असतो त्यामुळे या महिन्याला ज्येष्ठ हे नाव मिळालं.
आषाढ हा महिना पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांशी संबंधित आहे. आषाढा या नक्षत्रांपासून चंद्र या महिन्यात प्रवेश करतो म्हणून या महिन्याला आषाढ हे नाव मिळालं.
श्रावण महिन्याला नाव हे श्रवण या नक्षत्रावरून पडलं. चंद्र या महिन्यात श्रवण नक्षत्रातून संचार करतो म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव मिळालं.
भाद्रपद या महिन्याचे नाव पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा नक्षत्रांवरून पडलं. चंद्र या महिन्यात या दोन्ही नक्षत्रांत संचार करतो म्हणून या महिन्याला भाद्रपद असं नाव मिळालं.
आश्विन या महिन्याचं नाव आश्विन हे अश्विनी नक्षत्रावरून पडलं. चंद्र या महिन्यात अश्विनी नक्षत्रात संचार करतो म्हणून या महिन्याला आश्विन असे नाव मिळालं.
कार्तिक या महिन्याचं नाव कार्तिक हे कृतिका या नक्षत्रावरून पडलं. चंद्र या महिन्यात कृतिका नक्षत्रात संचार करतो म्हणून या महिन्याला कार्तिक असे नाव पडलं.
मार्गशीर्ष या महिन्याचं नाव हे मृगशीर्ष या नक्षत्रावरून पडलं. चंद्र या महिन्यात मृगशीर्ष नक्षत्रात संचार करतो म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असं नाव मिळालं.
पौष या महिन्याचे नाव पुष्य या नक्षत्रावरून पडलं. चंद्र या महिन्यात पुष्य नक्षत्रात संचार करतो म्हणून या महिन्यात पौष असं नाव पडलं.
माघ या महिन्याचं नाव मघा या नक्षत्रावरून पडलं चंद्र या महिन्यात मघा नक्षत्रात संचार करतो म्हणून या महिन्याला माघ असं नाव पडलं.
फाल्गुन या महिन्याचं नाव फाल्गुन हे पुर्वाफाल्गुनी- उत्तराफाल्गुनी या नक्षत्रांवरून पडलं. चंद्र या महिन्यात पूर्वाफाल्गुनी किंवा उत्तराफाल्गुनी या नक्षत्रात संचार करतो म्हणून या महिन्याला फाल्गुन असं म्हणतात.