Mumbai Shocking  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Mumbai Shocking news : उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अंधेरी परिसरात शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

मुंबईला फिरायला आलेल्या तरुणाचा 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

लोखंडी सळई कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू

अमर आनंद पगारे असे या तरुणाचे नाव

संजय गडदे, साम टीव्ही

नाशिकहून मुंबईत पहिल्यांदा फिरायला आलेल्या 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मरोळनाका परिसरात घडली आहे. मरोळ मेट्रो स्टेशनखाली सुरू असलेल्या ‘प्रिविलोन’ या विकासकाच्या बांधकाम साइटवरून सातव्या मजल्यावरून लोखंडी सळई कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमर आनंद पगारे असे या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, अमर पगारे हा आज सकाळीच नाशिकवरून मुंबईत फिरण्यासाठी आला होता. काही तासांतच घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मुंबईत गेल्या काही दिवसांत बांधकाम साइटवरून दगड, सळई आणि सिमेंट ब्लॉक्स कोसळून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे कधीकाळी गुन्हेगारीने, कधी अपघाताने, कधी बॉम्बस्फोटाने असुरक्षित वाटणारी मुंबई आता उंच इमारतींच्या बांधकामानेही असुरक्षित वाटू लागली आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांतही भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. बांधकाम इमारतीच्या सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहेत का? असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे.

नुकतीच जोगेश्वरी परिसरात १९ वर्षीय मुलीचा सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा अशीच एक घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक रहिवाशांचा प्रश्न आहे की, 'या उंच इमारतींच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही हमी आहे का? बांधकाम सुरू असताना योग्य सुरक्षा उपाय न केल्याने सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या घटनेत निष्काळजीपणा कोणी केला याचा तपास सुरू केला आहे.

मुंबईत कधी गुन्हेगारीने, कधी अपघाताने, तर आता उंच इमारतींमधून कोसळणाऱ्या सळईंनी जीव गमवावा लागतोय. हे दृश्य खरोखरच काळीज पिळवटून टाकणारे आहे. या वाढत्या घटनेने सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

SCROLL FOR NEXT