Saam Survey Ajit Pawar or Supriya Sule saam tv
मुंबई/पुणे

Political News : अजित पवार शरद पवारांपासून दूर का गेले? शिवसेनेच्या नरेश म्हस्केंचा मोठा दावा

Naresh Mhaske News : नरेश म्हस्के यांनी यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane News :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्याने पक्षात दोन गट निर्माण झाले. अजित पवार यांच्या या राजकीय निर्णयामुळे केवळ पक्षच नाही तर कुटुंब देखील दुभंगले आहे. पवार कुटुंबियांचं राजकारण अनेक वर्षांपासून राज्याने पाहिलं आहे.

मात्र अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षासोबतच पवार कुटुंबिय देखील एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र शरद पवारांनी बोट पकडून राजकारणात आणलेल्या अजित पवारांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अनेकांनी अनेक मतं आजवर मांडली आहेत. (Latest Marathi News)

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील एक दावा केला आहे. नरेश म्हस्के म्हणाले की, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळे अजित पवार शरद पावरांपासून लांब गेले. सकाळने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Political News)

नरेश म्हस्के यांनी यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांचं आधी बारामतीत काय होईल याचा विचार करावा, मग श्रीकांत शिंदेंची काळजी करा.

रोहित पावरांची अवस्था काय आहे हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल. अजित पवार यांच्या नेतृत्वासमोर आपण आधी बारामती लढवून दाखवा, त्यानंतर आम्हाला आव्हान किंवा सल्ले द्या, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: फराळ नरम पडतोय? मग सोप्या टिप्स लगेचच करा फॉलो, महिनाभर टिकतील चकल्या अन् चिवडा

IND vs AUS : वनडे सीरीजआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

७ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, महागडी घड्याळं... DIG च्या घरात कोट्यवधींचं घबाड, VIDEO

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ट्रकला लागली भीषण आग! पाहा थरारक VIDEO

Lawyer-Judge verbal spat: डोन्ट क्रॉस द लिमिट! वकिलानं न्यायाधीशांना रोखठोक सुनावलं, हायकोर्टातच ड्रामा

SCROLL FOR NEXT