Navi Mumbai , Narendra Modi , Narendra Patil, APMC Market saam tv
मुंबई/पुणे

Video : 'गुजरातची सध्या चलती आहे, आपले प्रश्न साेडविण्यासाठी नेत्यांना महाराष्ट्रात बाेलाविले पाहिजे'

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात माथाडी नेते नरेंद्र पाटील बाेलत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Narendra Modi News : देशपातळीवरील नेत्यांना महाराष्ट्रात बाेलावलं पाहिजे. माथाडी कामगारांचे, व्यापा-यांचे प्रश्न केंद्रांतील नेत्यांपर्यंत पाेहचविले पाहिजे. हे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटल्यास आपल्याला बळ मिळेल असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईत व्यक्त केले. (APMC Market Latest Marathi News)

माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एपीएमसी मार्केटमध्ये (apmc market) पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बाेलत हाेते.

माथाड्यांचे व व्यापाऱ्यांचे प्रश्न केंद्रातील नेत्यांपर्यंत पोहचवायला पाहिजे. त्याने आपल्याला अधिक शक्ती मिळेल. केंद्रातील नेते गुजरातचे आहेत आणि गुजरातची खूप चालते असे पाटील यांनी म्हटले. मला गुजराती येत नाही नाहीतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना गुजराती मधून पत्र लिहिलं असतं असे पाटील यांनी भाषण करताना भावना व्यक्त केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer warning signs: 99% लोकं चुकतात! ही लक्षणं दिसून आली तर समजा शरीरात कॅन्सरच्या गाठीची होतेय सुरुवात

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनाम

Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

Maharashtra Live News Update: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

Sutarfeni Recipe : हलवाई स्टाइल सुतार फेणी घरीच बनवा, राजस्थानी मिठाईचा आस्वाद घ्या

SCROLL FOR NEXT