Narendra Patil On Manoj Jarange Patil, Maratha Andolan saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांचा बाेलविता धनी काेण? : नरेंद्र पाटील

Narendra Patil On Manoj Jarange Patil : आपला मूळ उद्देश आरक्षण मिळवून देणे आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करावे असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Latest Marathi News) हे सातत्याने फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताहेत याचे कारण समजायला मार्ग नाही. ज्यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) दिले त्यांच्यावर टीका करणे याेग्य नाही. जरांगे पाटील यांचा बोलका धनी काेण आहे का? अशी शंका उपस्थित करुन जरांगे पाटलांनी बाेलताना बॅलन्स ठेवला पाहिजे असे मत माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील (mathadi kamgar leader narendra patil) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. (Maharashtra News)

नरेंद्र पाटील म्हणाले जरांगे पाटलांचे फडणवीस यांनी त्यांचं कुठलं घोडं ही मारलं नव्हतं, फडणवीस हे पाहिले व्यक्ती आहे ज्यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिल होते. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जरांगे पाटील हे बोलतात ते योग्य नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होतेय, याचा अर्थ कोणीतरी बोलका धनी याच्या मागे आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

पुढे बाेलताना पाटील म्हणाले शरद पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांना न्याय देण्याचं काम नरेंद्र माेदी यांनी केलंय त्याची अंमलबजावणी राज्यात फडणवीस करताहेत म्हणून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करतायत का?

उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या कारभारामुळे एकनाथ शिंदे यांना केंद्राने ताकद दिली त्याची अंमलबजावणी करण्याचं काम फडणवीस यांच्याकडे आहे म्हणून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर टीका करतायत का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जरांगे पाटील यांच्या टीकेचे कारण समजायला मार्ग नाही, त्यांना दुखतय की या दोन्ही माणसांच्या पक्षामध्ये खऱ्या लोकांना न्याय दिला त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखतय तेच कळायला मागत नाही असे पाटील यांनी नमूद केले.

जरांगे पाटील यांनी अधोगतीचे कारण फडणवीस हेच आहेत असे म्हणतात मात्र आपला मूळ उद्देश आरक्षण मिळवून देणे आहे, आपण त्याकडे लक्ष केंद्रित करावे. आम्ही तुमच्या बरोबर आहाेत. आम्ही आमच्या पद्धतीने नवी मुंबईत आंदोलन केले. याचा अर्थ असा नाही तुम्ही गृहमंत्र्यांवर टीका कराल आणि आम्ही ते मान्य करू असेही पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT