Kandivali Police
Kandivali Police  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत 52 लाखांचे अमली पदार्थ जप्त, BMS च्या विद्यार्थ्याला अटक

Priya More

Mumbai Police: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ड्रग्स माफियांविरोधात (Drugs Mafia) कारवाईसाठी कंबर कसली आहे. कांदिवली पोलिसांच्या अँटी-नॉर्कोटिक्स सेलने अंधेरीतील (Andheri) एका पॉश बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या बीएमएसच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 522 एलएसडी डॉट्स पेपर जप्त केले आहेत.

ऋषिकेश (21 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. जप्त केलेल्या एलएसडी ड्रग्सची किंमत जवळपास 52 लाख 22 हजार रुपये इतकी आहे. आरोपी बीएमएसचा विद्यार्थी (BMS Student) असून तो बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये फिल्म स्टार्सच्या रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवण्याचे काम करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी मरोळच्या पॉश भागामध्ये राहणारा एक विद्यार्थी फिल्मी कलाकार आणि सेलिब्रिटींच्या रेव्ह पार्टीला ड्रग्ज पुरवतो अशी माहिती कांदिवली नार्कोटिक्स पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कांदिवली अंमली पदार्थ विभागाचे वरिष्ठ पीआय रुपेश नाईक आणि तपास अधिकारी पीआय खोलम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार केले.

या तपास पथकाने ड्रग्स पुरवणारा विद्यार्थी राहता असलेल्या इमारतीच्या परिसरात रात्रभर सापळा रचला. विद्यार्थी एका पार्टीला जाण्यासाठी सोसायटीतून बाहेर पडत असताना तिथे आधीच उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्याला ताब्यात घेत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पंचासमोर त्याची तपासणी केली असता विद्यार्थ्याच्या खिशातून व्यावसायिक प्रमाणात डॉट्स एलएसडी आढळून आले.

पोलिसांनी या विद्यार्थ्याला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली आहे. हा विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणीची तपासणी केली असता त्याठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात डॉट्स एल एस डी ड्रग्स जप्त करण्यात आले. ज्याची किंमत सुमारे 52 लाख 22 हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांच्या चौकशीत विद्यार्थ्याने सांगितले की, 'तो कोरोना काळामध्ये लॉकडाऊनपासूनच ड्रग्जचा व्यवसाय करत आहे. रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवण्याचे काम तो करतो. तो बीएमएमचा विद्यार्थी असून अंधेरीतील एका पॉश हायराईज बिल्डिंगमध्ये राहतो.' दरम्यान, कांदिवली पोलिस आता विद्यार्थ्याला ड्रग्ज पुरवणाऱ्या मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Today's Marathi News Live : नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT