Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

Dehydration Treatment at Home : चक्कर येणे, अशक्तपणा येणे, उन्हामुळे डोके दुखणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतू उन्हाळ्यामध्ये काही खास पेय पिऊन तुम्हीं डिहायड्रेशनपासून
Dehydration Treatment
Dehydration Treatment SaamTV

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच अनेक व्यक्ती उष्माघाताला बळी पडले आहेत. ऊन तीव्र असल्याने अनेकांना डीहायड्रेशन या समस्येला सामोरे जावे लागत आहे. चक्कर येणे, अशक्तपणा येणे, उन्हामुळे डोके दुखणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतू उन्हाळ्यामध्ये काही खास पेय पिऊन तुम्हीं डिहायड्रेशनपासून तसेच अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.

Dehydration Treatment
Summer Health Care: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना ACमध्ये झोपवताय? तर घ्या 'या' गोष्टीची काळजी

नारळ पाणी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. शरीर तंदुरुस्त आणि सुदृढ राहण्यास मदत होते. सोबतच दररोज नारळ पाणी पिल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे दररोज किंवा दोन दिवसातून एकदा एक नारळ पाणी पिलेच पाहिजे.

उसाचा रस

उन्हाळ्यामध्ये अनेक व्यक्ती थकवा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस किंवा रसना म्हणजेच ज्यूस पावडर पितात. परंतु ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. या ऐवजी तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उन्हामुळे थकवा जाणवत असतो आणि उसामध्ये ग्लुकोजचेप्रमाण जास्त असल्यामुळे तुमचा थकवा चुटकीसरशी दूर निघून जातो.

संत्री रस

संत्री आरोग्यासाठी थंड असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी संत्र्याचा रस बनवू शकता. यामध्ये थोडं दूध आणि मिल्क पावडर मिक्स करावी. तसेच गोडवा यावा यासाठी ज्यूसमध्ये साखर अॅड करा. अन्यता फक्त संत्र्यांचा ज्यूस थोडा कडवट लागतो.

Dehydration Treatment
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ कसा टिकणार? वाचा टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com