मुंबईतील निर्णायक अशा कोकणी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपनं नवीन मास्टर प्लॅन आखलाय..मुंबईत कोकणी मतांची धुरा आता भाजपचे खासदार नारायण राणेंच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय.... त्यामुळे ठाकरेसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ आता मुंबईत धडाडणार आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर राणेंकडे ही जबाबादारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे...त्यामुळे मुंबईच्या राजकारणात आता 'राणे विरुद्ध ठाकरे' असा संघर्ष पेटणार आहे... भाजपनं नेमकी काय रणनीती आखलीय?
मुंबईतील दादर, परळ, लालबाग, माझगाव, शिवडी आणि जोगेश्वरी यांसारख्या विभागांत कोकणी मतदारांचे मोठे प्राबल्य आहे. हा मतदार पारंपरिकरित्या ठाकरेंसोबत राहिलाय..मात्र, राणे कोकणातील दिग्गज नेते असल्याने आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवल्याने, मुंबईतील चाकरमान्यांमध्ये राणेंचं वजन..भाजपकडून कोकणी मतांचे ध्रुवीकरण करून ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न..
नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं 207 चा आकडा गाठत मविआचा चांगलाच सुपडासाफ केला... त्यात कोकणात ठाकरेसेनेच्या अस्तित्वाला राणेंनी चांगलाच धक्का दिलाय... अशातच ठाकरेंचा जीव ज्या मुंबई महापालिकेत अडकलाय... त्याच मुंबई महापालिकेत भाजपनं राणेंना मैदानात उतरवल्यानं ठाकरेंपुढे मोठं आव्हानं उभं राहणार आहे.... त्यामुळे आता मुंबईतील कोकणी मतदारांना साद घालण्यात कोण यशस्वी होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.