Narayan Rane- Vinayak Raut Saam TV
मुंबई/पुणे

नारायण राणेंनी ED कार्यालयातून कागदपत्र चोरली? विनायक राऊतांचा गंभीर आरोप

नारायण राणेंनी शिवसेनेच्या नेत्यांवरती खुनाचे बलात्काराचे आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काल एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना टार्गेट केले होते. त्याला उत्तर म्हणून आज विनायक राऊत (Vinayak Raut Press) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. इडीच्या मातोश्री वरील चार जणांना नोटीस येणार असं त्या ट्विटमध्ये लिहिले होते. आजही नारायण राणेंनी (Narayan Rane) पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला विनायक राऊतांनी 'खोदा पहाड निकला कचरा' अशी उपमा दिली आहे. भाजप गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी धडपड सुरु आहे. स्वाभीमान गुंडाळून ठेवायचे, लाचारी पत्करायची हे नारायण राणेंकडून शिकायचे. एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा गैरउपयोग करणे धमकी देणे हे चुकीचं असल्याचं टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

ईडी नोटीस येईल हे सांगताना एडी मधून कागदपत्र चोरी केली असतील किंवा अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असेल गंभीर टीका विनायक राऊत यांनी केली आहे. नारायण राणेंनी शिवसेनेच्या नेत्यांवरती खुनाचे बलात्काराचे आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, दुसऱ्यांवर खुनाचे आरोप करताना राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, भूतकाळ आठवत नसेल तर आठवण करून देतो. सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या कारकीर्दीत खून दरोडे खंडणीचे प्रकार नऊ वर्ष घडले. रमेश गोवेकर, अंकुश राणे, मंचेकर ह्यांचे खून कोणी केले? श्रीधर नाईक खुनात आरोपी म्हणून कोण होते हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आणू नका असे विनायक राऊत म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Maharashtra Live News Update: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT