Narayan Rane vs Manoj Jarange Saam TV
मुंबई/पुणे

Narayan Rane News: मनोज जरांगेंच्या 'त्या' इशाऱ्यानंतर नारायण राणे भडकले; थेट ट्वीट करत साधला निशाणा

Narayan Rane vs Manoj Jarange: सरकारने सगेसोयरे अध्यादेशाबाबत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला होता.

Satish Daud

Narayan Rane criticizes Manoj Jarange Patil

राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर भाजप नेते नारायण राणे चांगलेच संतापले आहेत.

राणे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत मनोज जरांगे पाटील यांना थेट इशाराच दिला आहे. "मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही", असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

"देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत", असा इशाराही राणे यांनी जरांगेंना दिला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या या इशाऱ्यानंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आपलं उपोषण सुरूच ठेवलं असून त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती मराठा बांधव करीत आहेत.

मात्र, जरांगे उपोषणावर ठाम असून उपचारासाठी नकार देत आहेत. राज्य सरकार जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाबाबत काय करत नाहीत, तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवणार, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. सरकारने तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT