संजय राऊत तुमच्या खासदार सांभाळा अन्यथा...! ; राणेंचा राऊतांना इशारा Saam Tv News
मुंबई/पुणे

संजय राऊत तुमच्या खासदार सांभाळा अन्यथा...! ; राणेंचा राऊतांना इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे संजय राऊत, नवाब मलिक यांच्यावर निशाना साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे संजय राऊत, नवाब मलिक यांच्यावर निशाना साधला आहे. दिवाळीला फटाके वाजवायचे असतात पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, फटाके वाजवा पण धूर सोडू नका आणि आवाज करू नका असे फाटके फक्त महाविकास आघाडीतच मिळतात असे नारायण राणे म्हणाले. बारामतीत जो कार्यक्रम झाला त्यावर टीका करताना राणे म्हणाले एक धूर बारामतीत पहायला मिळाला ज्याला आवाज नव्हता आणि धुरही नव्हता. राज्याबाहेर शिवसेनेच्या झालेल्या विजायवर राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली. दादर-हवेलीची जागा अपक्ष उमेदवाराने जिकली पण शिवसेनेने डंका पिटला पण त्या उमेदवाराची निशाणी 'फलंदाज' आहे. संजय राऊतांच्या लिखाणावर प्रश्न उपस्थीत करताना राणे म्हणाले, लिहिताना भान नसते असे वाटते रात्री करायच्या गोष्टी संजय राऊत दिवसा करतात असे त्यांचे लिखाण बघून वाटतंय.

तुमच्या खासदार सांभाळा अन्यथा...

संजय राऊत डेलकर तुमच्या खासदार म्हणता तर टिकवून दाखवा नाहीतर काही दिवसांनी त्या भाजपात यायच्या अशी खोचक टीका राणेंनी राऊतांवर केली आहे. त्यांनी नवाब मलिकांवर देखील निशाना साधला ते म्हणाले राष्ट्रवादीने सध्या मलिकांनी सोडून दिले आहे. त्यांच्या जवायाचे काय काय उद्योग आहेत सर्वांना माहीत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या मंत्र्यांची चिंता करावी उगाच डायलॉग बाजी करू नये.

आधी युती केली आणि नंतर गद्दारी केली.

दादरा नगर हवेलीच्या विजयावर संजय राऊत म्हणाले होते की आम्ही आता दिल्ली काबीज करणार आहोत, त्यावर बोलताना राणे म्हणाले ''दिल्लीत धडक मारायला आलात तर डोके ठिकाणावर राहणार नाही. तुमचे जे आता आमदार आणि खासदार आहेत ते मोदींच्या जीवावर आहेत. आधी युती केली आणि नंतर गद्दारी केली. काहीजण म्हणतात की उद्धव ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी झाली राज्यात आज बरेच जण वेटिंग लिस्टवर आहे म्हणून अजित दादा मुख्यमंत्र्यांनी सेम टू यू बोलले असावेत असे राणे म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना राणे म्हणाले मुख्यमंत्री पदावर बसवलं म्हणून उद्धव ठाकरेंनी निष्ठा विकली याआधी यांनी म्हटले होते धरणामध्ये अजित पवार यांना पाठवू नका, कॉंग्रेसवरही टीका केली होती.

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून यांनी मुख्यमंत्री पद मिळवले अशी मोठी टीका राणेंनी केली आहे. राज्यातीस एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्याला देखील राणेंनी हात घातला म्हणाले ''आज एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यावर बोला की हे फक्त टिंगल टवाळी करत आहेत. यांनी याआधी सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली होती. शरद पवार यांना लाचार असे उद्धव ठाकरे म्हणाले होते मात्र आता त्याच पवारांसमोर लाचार होऊन हे मुख्यमंत्री झाले. आधी शरद पवार यांच्यावर टीका केली आणि आता बारामतीमध्ये जाऊन कौतुक करत आहेत''.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT