अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन Saam Tv
मुंबई/पुणे

अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन

मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे राज्यात सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा आमने- सामने आल्याचे चित्र बघायला मिळत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्र्यांबद्दल CM केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना अटक Arrested झाल्यामुळे राज्यात सत्ताधारी शिवसेना Shiv Sena आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा BJP आमने- सामने आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकीकडे नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधामध्ये संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे चित्र दिसून आले आहे. दुसरीकडे भाजपाची ठामपणे नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला दिसत आहे.

दरम्यानच, भाजपाच्या राज्य पातळीवर असलेल्या नेत्यांनंतर आता केंद्रीय पातळीवर नारायण राणेंना पाठिंबा मिळताना दिसत आहे. अटकेच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांनीही नारायण राणेंना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार Pramod Jathar यांनी केली आहे.

हे देखील पहा-

यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडे पोलिसांनी Police करण्यात आलेली कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबत तपशील याविषयी माहिती घेतली आहे. नारायण राणेंच्या अटकेची arrest थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे आता या प्रकरणावर भाजपा पुढे काय करणार याबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या विधानाशी सहमती दर्शवली नसली तरी देखील भाजपा राणेंच्या पाठीशी उभा राहणार, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

तर नारायन राणेंच्या मागे पक्ष उभा राहील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी सांगितले होते. तसेच नारायण राणेंवर कारवाई विरोधामध्ये भाजपानेही देखील मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलने केली आहेत. आता अटकेच्या कारवाईमुळे थांबलेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून परत सुरू होणार आहे. जामिनावर सुटल्यानंतर काल नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

त्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्ही माझे काही देखील करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. प्रत्येकवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला चांगलेच डिवचले आहे. आपली जन आशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून सिंधुदुर्गपासून परत सुरू होईल, असे त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणात अटक झाल्यावर महाड कोर्टाने मंगळवारी रात्री राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT