VIRAR NARANGI RAILWAY FLYOVER OPENED | BIG TRAFFIC RELIEF FOR VIRARKARS Saam tv
मुंबई/पुणे

Virar : विरारकरांचा प्रवास सुसाट होणार! बहुप्रतीक्षित नारंगी ब्रिज प्रवाशांसाठी खुला

Virar Narangi Bridge News : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विरारमधील चौपदरी नारंगी रेल्वे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • विरारमधील नारंगी रेल्वे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला

  • चौपदरी पुलामुळे विरार पूर्व आणि पश्चिम जोडणी अधिक सुलभ होणार

  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा

  • माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर प्रकल्प पूर्णत्वास

मनोज तांबे, विरार

विरार शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नारंगी रेल्वे उड्डाणपूल अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, महापौर अजीव पाटील, आमदार राजन नाईक, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आजपासून हा चौपदरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून त्यामुळे विरारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विरारच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या उड्डाणपुलाची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सुरुवातीला दोन पदरी असलेल्या पुलाचा आराखडा बदलून तो चार पदरी करण्यात यावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. त्यासाठी तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाशी समन्वय साधत प्रयत्न केले.

आराखड्यात बदल झाल्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास काहीसा विलंब झाला. मात्र, भविष्यातील वाहतुकीचा ताण लक्षात घेता घेतलेला हा निर्णय आता विरारकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यापूर्वी विरार पूर्व आणि पश्चिम जोडणारा एकमेव पूल हलक्या वाहनांसाठीच उपलब्ध असल्याने नागरिकांना काहीशे मीटरचे अंतर पार करण्यासाठी तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते.

महापौर अजीव पाटील यांनी उद्घाटनापूर्वी पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सुरक्षिततेबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच जुन्या फाटकाच्या ठिकाणी नागरिकांसाठी कायमस्वरूपी भुयारी मार्ग उभारण्याची मागणीही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. अखेर सर्व तांत्रिक अडथळे दूर करत हा उड्डाणपूल पूर्णत्वास आला असून त्यामुळे विरार शहराच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. शहराच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT