नानासाहेब गायकवाड आणि पुत्राला 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी Saam Tv
मुंबई/पुणे

नानासाहेब गायकवाड आणि पुत्राला 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी

पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांना २७ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे: पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांना २७ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. काल अखेर दीड महिना शोध घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केली होती. गणेश गायकवाड याने त्याची पत्नी आणि राष्ट्रवादीचे सोलापूरचे नेते दीपक आबा साळुंखे यांच्या मुलीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करून कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी पहिला गुन्हा चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

यानंतर गणेश गायकवाड नानासाहेब गायकवाड यांच्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये खंडणी, बलात्कार जीवे मारण्याची धमकी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बाप लेकांसह आणखी दोघांवर मोकाची कारवाई केलेली होती.

तेव्हापासून गेले दीड महिना गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड हे दोघेही फरारी होते. त्यांच्या मागावर पुणे पोलिसांची अनेक पथके काम करत होती अखेरीस त्यांना काल कर्नाटक मधून अटक केली होती. आज त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात आले. त्यात त्यांना २७ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. नानासाहेब गायकवाड हे चिंचवड चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 22 दिवसापासून समायोचन करण्याच्या मागणीसाठी संपावर..

वरळी सी लिंकवर थरारक अपघात! चारचाकीने पोलीस हवालदाराला चिरडलं, जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण काय?VIDEO

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT