Maharashtra Political News: Congress Nana Patole's Suggestion on Manoj Jarange Patil After His Statement On Rahul Gandhi Saam tv
मुंबई/पुणे

Nana Patole News: मनोज जरांगे यांनी सरकारशी भांडावं,पण...'; राहुल गांधींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंनी दिला सल्ला

Nana patole on Manoj Jarange news: वडेट्टीवार यांचा सल्ला झुगारून मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांचं नाव घेत टीका केली होती. मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

शुभम देशमुख, गोंदिया

Maharashtra Political News:

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले. मात्र, हे आरक्षण मनोज जरांगे यांना नामंजूर आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी मराठा समाजाला जितकं आरक्षण मिळालं आहे, त्याच्यामध्ये समाधान मानावं, असा सल्ला दिला होता. वडेट्टीवार यांचा सल्ला झुगारून मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांचं नाव घेत टीका केली होती. मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांचे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला जितकं आरक्षण मिळालं आहे, त्याच्यामध्ये समाधान मानावं, असं वक्तव्य केलं होतं. यावरून मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रतिउत्तर देत त्यांना राहुल गांधी यांनी मराठा समाजाच्या विरोधात बोलायला सांगितलं का? अशी टीका केली होती.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले,'मनोज जरांगे आणि सरकारचा वाद आहे, म्हणून जरांगे यांनी सरकारशी काय भांडायचे ते भांडायला पाहिजे. मात्र कोणावर टीका करू नये, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला. तर त्यांनी पुढे सरकारवर टीका करत हे फसवा फसवी चे सरकार आहे. या सरकारवर आता कोणाचा विश्वास राहिला नाही, असेही पटोले म्हणाले

मनोहर जोशी यांच्या निधनानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली संवेदना

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबई येथे निधन झालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवेदना व्यक्त करत प्रशासकीय व्यवस्था मजबुतीने सांभाळणारे, मुख्यमंत्री असताना व लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची नेहमी भूमिका राहिली. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला, अशी संवेदना नाना पटोले यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT