Pune News: विद्यार्थ्यांसाठी मनसे रस्त्यावर! अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंचा पुणे विद्यापीठावर विराट मोर्चा; काय आहेत मागण्या?

MNS March On Pune University: अमित ठाकरेंसोबत आई शर्मिला ठाकरेही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेकडून या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
MNS March On Pune University
MNS March On Pune UniversitySaamtv
Published On

नितीन पाटणकर, पुणे|ता. २३ फेब्रुवारी २०२४

Pune Amit Thackeray March News:

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आज पुणे विद्यापीठावर विराट मोर्चा काढण्यात आला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. अमित ठाकरेंसोबत आई शर्मिला ठाकरेही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेकडून या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमित ठाकरे (Amit Thackeray), शर्मिला ठाकरेंसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या संदर्भात अमित ठाकरे यांनी कुलगुरुंशी चर्चा केली. मनसेच्या या विराट मोर्चामुळे विद्यापीठ चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले. मोर्चामध्ये शर्मिला ठाकरेही सहभागी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MNS March On Pune University
Ahmednagar Politics: गावात डरकाळ्या फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा; सरपंच महिला विखे पिता-पुत्रावर कडाडल्या

काय आहेत मागण्या?

  • मराठी भाषा भवन झालेच पाहिजे !

  • नाशिक व नगर उपकेंद्रांमध्येच विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध व्हायला हवीत.

  • विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा ऑनलाईन करा.

  • दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा.

  • विशाखा समितीत विद्यार्थिनींना प्रतिनिधित्व द्या!

  • वसतिगृहांचा सर्वांगीण दर्जा सुधारा.

  • १०,००० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती करा.

  • शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईसाठी नियमावली बनवा !

  • विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आणि प्लेसमेंट पोर्टल सुरू करावे. रोजगार मेळावे घ्यावेत. (Latest Marathi News)

MNS March On Pune University
Ahmednagar Politics: गावात डरकाळ्या फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा; सरपंच महिला विखे पिता-पुत्रावर कडाडल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com