nana patole  Saam tv
मुंबई/पुणे

Nana Patole : अशोक चव्हाणांना शेवटच्या रांगेत बसावं लागेल...; भाजप प्रवेशावर नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

Vishal Gangurde

सुनील काळे, मुंबई

Nana Patole News:

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस गोटात हालचाली वाढल्या आहेत. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. 'आता तिकडे गेल्यावर त्यांना शेवटच्या रांगेत बसावं लागेल. आमचं आजही म्हणणं आहे की त्यांनी विचार करावा, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी भाजप प्रवेशावर दिली. (Latest Marathi News)

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं.

'आम्ही आमचा माणूस तिकडे पाठवला आहे. ते आशिष शेलारांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बोलले. त्यांना परत यायचं असेल तर त्यांनी यावं. ते नेतृत्व करणारे नेते आहेत. आता त्यांना मागे बसावं लागेल. आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे. त्यांना भाजपमध्ये नेतृत्वाची संधी मिळणार नाही, असं नाना पटोले म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी अशोक चव्हाणांची पत्रकार परिषद पाहिली. ते काँग्रेसला विसरू शकत नाही. आमचा माणूस तिकडे भाजपमधील लोकांना आणायला पाठवला आहे. काँगेसने त्यांना आघाडीसाठी संधी दिली होती. आता अजूनही काही बिघडले नाही. त्यांनी पुन्हा यावं. आम्ही सर्व जण स्वागत करायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

नाना पटोले पुढे म्हणाले, 'दिल्लीचे आका राज्यात सारखे सर्व्हे करत आहेत. त्यात आघाडीला जागा दाखवत आहेत. त्यामुळे स्वत:ची जागा वाचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांचा असफल प्रयत्न आहे'.

फोडाफोडीच्या राजकारणावर पटोले म्हणाले, 'आम्ही १५ तारखेला सर्व सोबत असणार आहोत. त्यानंतर आम्ही लोणावळ्याच्या शिबिराला एकत्र आहोत. या अफवांना पूर्णविराम द्यावा. भाजपचे आमदार-खासदारच आमच्या संपर्कात आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT