Ashok Chavan Video: भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाण असं काही बोलून गेले की, सगळे खळखळून हसले, पाहा Video

Ashok Chavan Video: काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर त्यांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला.
Ashok Chavan Video
Ashok Chavan VideoSaam Digital
Published On

Ashok Chavan Video

काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर त्यांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. भाजपमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते चुकून मुंबई काँग्रेस बोलून गेले. त्यामुळे सभागृहात एक हशा पिकला. त्यावर त्यांनी पक्षप्रवेशानंतर पहिलीच पत्रकार परिषद आहे, त्यामुळे चुकून काँग्रेसचं नाव आलं, अशी सारवासारव केली. दरम्यान काँग्रेसच नाव चुकून आलं तरी याची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली आहे.

काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपपध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर उपेक्षेप्रमाणे त्यांनी आज भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका किंवा आरोप करण्याचं त्यांनी टाळलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर नसल्याचं ते म्हणाले.

Ashok Chavan Video
Ashok Chavan: पक्षासाठी मी खूप काही दिलं, पण..., भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचं खरं कारण

सभागृहाच्या बाहेर आदर बाळगला. ती परंपरा कायम महाराष्ट्रात रहावी. जी काही पक्षाची धोरणा आहे आणि पक्ष जे आदेश देतील त्या प्रमाणे मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कोणीही जा म्हटलं नाही. जिथे होतो तिथे मी शेवटच्या क्षणापर्यंत काम केल आहे. त्यामुळे आज तरी मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. आम्ही सर्वांनी विकासासाठी एकमेकांना साथ दिली. आज मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात हा एक नवा बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करता याची. देशाच्या प्रगतीत आपला वाटा असावा या प्रमाणिक भूमिकेतून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले.

Ashok Chavan Video
Uddhav Thackeray: 'भ्रष्टाचार करा अन् भाजपमध्ये या ही मोदींची गॅरेंटी...' उद्धव ठाकरेंचा घणाघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com