नेहरूमुळे देशाचं वाटोळं झाले हे राज्यपालांचे वक्तव्य दुर्दैवी  saam tv news
मुंबई/पुणे

नेहरूमुळे देशाचं वाटोळं झाले हे राज्यपालांचे वक्तव्य दुर्दैवी

राज्यपाल भवन हे भाजप कार्यालय झालयं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माजी पंतप्रधान पंडित नेहरू (Former Pm Pandit Jawaharlal Nehru) यांच्यामुळे देशाचं वाटोळं झाले हे राज्यपालांचे (Governor) वक्तव्य दुर्दैवी आहे. काँग्रेसचा इतिहास हा स्वातंत्र्य लढ्याचा आहे. पण राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ता असल्यासारखे वागतात. राज्यपाल भवन हे भाजप कार्यालय झालयं.राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही. असे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra Pradesh Congress Committee) वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुण्यातील 9Pune) टिळक वाड्यापासून (Tilak Wada) या अभियानाची सुरुवात झाली असून 15 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भुमिकेवर टिका केली. तसेच त्यांनी यावेळी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला.

''या केसरी वाड्याला देखील स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. केसरी त्याचं उदाहरण आहे पण विरोधात लिहिलं म्हणून आजचं सरकार भास्कर सारख्या ग्रुपवर छापे टाकतंय. आता लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधातील लढ्याची सुरूवातही टिळक वाड्यातून करूयात. हा देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढाच म्हणा फारतर. पण ही लढाई आपण पुन्हा लढुयाात. असे आवाहन नाना पटोले यांनी काँग्रेस जनांना केले आहे.

तसेच, यावेळी बोलताना त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. संविधानाने मला दिलेला अधिकार हिरावला जात आहे. अनेक नेते माझी तक्रार करतात. मी पण टिळकांसारखा जहाल गटात मोडतोय. त्यामुळे मला जहाल म्हटलं तरी चालेल. अशा शब्दांत त्यांनी आपल्याच नेत्यांबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT