Nana Patole Saam TV
मुंबई/पुणे

MVA CM Face : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी थेट सांगितलं,VIDEO

Nana patole on MVA CM Face : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं भाष्य केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

Vishal Gangurde

तरबेज शेख, साम टीव्ही

नाशिक : निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविषयी नाना पटोले यांनी मोठं भाष्य केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. 'महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे चाललो आहे. महाराष्ट्र वाचविणे आमचा धर्म आहे,तर त्यांचा सत्तेचा धर्म आहे. मुख्यमंत्री कोण बनणार यावर, हायकमांड निर्णय घेईल, असे पटोले म्हणाले.

हिरामण खोसकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, 'काँग्रेसच्या विचाराने हिरामण खोसकर निवडून आले आहेत. क्रॉस मतदान झालं, त्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी काँग्रेससोबत फारकत घेतली आहे. ते पुढील निवडणुकीत निवडून येत नाही. 2 दिवसांपूर्वी त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. आता 226 जागा फायनल झाल्या आहेत. राहिलेल्या जागा वाटून घेऊ. 288 जागा महाविकास आघाडी लढेल. जनतेचा आशीर्वाद महाविकास आघाडीच्या बाजूने आहे'.

'महायुती सरकार असंविधानिक होते. बेईमानीमुळे यांना अनेक पदे मिळाली आहेत. काळिमा फासणारे हे सरकार आहे. सत्ता पक्षाचे नेते, महिला सुरक्षित नाहीत. विकासाच्या नावाने मोठा भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रात बहुमताने सरकार येईल. आमच्यात भांडणे लावू नका. कुठल्याही जागा घोषित केल्या नाहीत. इगतपुरीला गावित होत्या, पक्ष बदलल्याने त्या गायब झाल्या. निर्मला गावित आल्या तर स्वागत करू, असे पटोले पुढे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पटोले पुढे म्हणाले, 'हे बेईमान भाऊ आहेत. भावांच्या खिशातून पैसे काढले. जनतेच्या पैशांची उधळपट्टी चालली आहे. मी अर्ज भरलाय पक्षाकडे दिलाय. साकोली विधानसभामधून अर्ज केलाय. नागपूरमधून पक्षाने सांगितले तर लढेल. इगतपुरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात खूप लोक इच्छूक आहेत. आजही 3 लोकांनी अर्ज केले आहेत. जे कार्यकर्ते तिकडे गेले, ते परत इकडे येऊ शकतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT